मुंबई :महापालिका सभागृहात महापौर उशिरा आल्याने आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्याकिशोरी पेडणेकरयांनी महापौरांच्या खुर्चीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.सोमवारी दुपारी दोन वाजता सभा होणार होती. मात्र, सुमारे पावणेतीन वाजेपर्यंतमहापौर रितू तावडेआणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित नव्हते. दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा , काँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. कोरम पूर्ण असल्याचा दावा करत पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसून कामकाज सुरू करण्याची भूमिका घेतली.Devendra Fadnavis | अद्भूत विजय ! रसगुल्ला खाऊन तोंड गोड केलं, मोदींचं कौतुक ममतादीदींवर निशाणाया वेळी काही नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. महापालिका सचिवालयातील अधिकाऱ्यांनी नियमांची माहिती देत समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र काही वेळ त्या भूमिकेवर ठाम राहिल्या. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे सभागृहात आल्यानंतर त्यांनीही नियमांनुसार तसे करता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर महापौर आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सभागृहात दाखल झाल्यानंतर पेडणेकर या आपल्या आसनावर परतल्याने परिस्थिती निवळली.पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या निमित्ताने भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात जल्लोष केला. या विजयानिमित्तमुंबई महापालिकासभागृहात भाजपने अभिनंदनाचा ठराव मांडला. तर सभागृहात पेढे वाटले. मात्र या अभिनंदनाच्या ठरावावर सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला नसरापूरच्या घटनेची आठवण करून दिली.Maharashtra AI Policy: सरकारी विभागांना 'एआय' प्रकल्प बंधनकारक; गतिमान, पारदर्शक कारभारासाठी राज्य सरकारचा निर्णयपरंपरेचा मुद्दा उपस्थितसभागृह उशिरा सुरू होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करत पेडणेकर यांनी परंपरेचा मुद्दा उपस्थित केला. महापौर आणि उपमहापौर अनुपस्थित असल्यास माजी महापौरांना पीठासीन अधिकारी म्हणून बसवण्याची पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांना महापौरांच्या खुर्चीत बसवण्यात आल्याचा उल्लेख करत, त्याच पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षाचे नगरसेवक वेळेवर उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला.
मुंबईच्या महापौरांच्या खुर्चीमुळे विधानसभा सभागृहात गोंधळ
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.