म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात अन्नातून विषबाधा झाली की, अन्य कारण होते, याचा तपास सुरू असताना वैद्यकीय उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाल्याची बाब फोरेन्सिक व वैद्यकीय तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आली आहे.उपचारात विलंबजेवणानंतरकलिंगडाचे सेवनकेल्यानंतर कुटुंबातील चारही जणांना पोटदुखी, उलट्या व अतिसाराची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर परिसरातील एका डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेण्यात आले. त्यामुळे त्यांना काही काळ आराम मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, काही वेळाने त्रास पुन्हा वाढला. अशा स्थितीत रुग्णालयात तातडीने दाखल होणे अपेक्षित असताना ते घरीच थांबल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती बिघडल्यावर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी सुमारे ११ ते पावणे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना दाखल केल्याचे समजते.विषबाधेचे नेमके कारण अद्याप अनिश्चितवैद्यकीय उपचारात ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा मानला जातो. या काळात उपचार न झाल्यास लक्षणे गंभीर होण्याची शक्यता वाढते. शवविच्छेदनानंतर घेतलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात तीव्र स्वरूपाची विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र,पायधुनीयेथील विषबाधेचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे 'बारा' वाजले! आता '12 तास काम, 24 तास आराम' संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणीकलिंगडाबाबत एफडीएचा अंतिम निष्कर्ष बाकीकलिंगडामुळे विषबाधा झाली का, याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून अंतिम निष्कर्ष देण्यात आलेला नाही. संबंधित तपास सुरू असून फोरेन्सिक विभाग व वैद्यकीय तज्ज्ञांचा अंतिम अहवाल अद्याप पोलिसांकडे सादर झालेला नाही. तसेच प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.सुनेत्रा पवार बारामतीच्या नव्या कारभारी, सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम नावावरतपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मृत्यूचे नेमके कारण केवळ 'विषशास्त्र अहवाल' (Toxicology Report) प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. अन्नामध्ये'मॉर्फिन'सारखे धोकादायक विषारी पदार्थअसू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. जे.जे. मार्ग पोलीस सर्व बाबींचा सखोल विचार करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.Pune Nasrapur Case : मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा; आरोपीची बायको म्हणते, 11 वर्ष संबंध नाही, शिक्षा करा, बॉडीही देऊ नकाअहवाल प्राप्त होताच केली जाईल कारवाईवरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांनी सांगितले की, ठोस पुरावे (म्हणजेच अहवाल) हाती येताच पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल आणि या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर उपाययोजना केल्या जातील. सद्यस्थितीत, या प्रकरणी 'अपघाती मृत्यूची नोंद' (ADR) करण्यात आली असून, त्याबाबतचा तपास सुरू आहे. तसेच, या संदर्भात सुमारे डझनभर व्यक्तींचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत.
मुंबईत वैद्यकीय उपचारांना विलंब झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.