Achira News Logo
Achira News

मुमताजः बॉलीवूडचा सुपरस्टार तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो

Maharashtra Times
मुमताजः बॉलीवूडचा सुपरस्टार तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो
Full News
Share:

मुंबई -बॉलिवूडच्या सुपरस्टार मुमताज यांनी अनेक गाजेलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. उत्कृष्ट अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे मुमताज यांना प्रचंड यश मिळालं. अगदी त्या काळातील सर्वात मोठे स्टार, शम्मी कपूरसुद्धा अभिनेत्रीच्या सौंदर्यानं मोहित झाले होते. शम्मी कपूर यांनी मुमताज यांना लग्नाची मागणी घातलेली. याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मुमताज यांनी भाष्य केलं आहे.शम्मी कपूर यांनी लग्नाची मागणी घातलीबॉलिवूडचेमोठे स्टार शम्मी कपूर मुमताज यांच्या सौंदर्यानं मोहित झाले होते. शम्मी कपूर यांनी त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या मुमताज यांना लग्नाची मागणी घातलेली. मुमताज यांचंही त्यांच्यावर प्रेम होतं, पण कपूर कुटुंबाची अट म्हणजे, कपूर घराण्यातील सुनेनं लग्नानंतर सिनेमात काम करायचं नाही. मुमताज यांना त्यांचं करिअर सोडायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला.मला शमीसोबत पळून जायचं होतं: बीना रमाणी'सितारो का सफर'ला दिलेल्यामुलाखतीमध्येमुमताज शम्मी कपूर यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या की, 'आमच्या वयात खूप वर्षांचं अंतर होतं. मला त्यांच्यासोबत लग्न करायला प्रॉब्लेम नव्हता. त्यांचे वडील खूप चांगले होते, पण, त्यांचं असं होतं की, लग्न झाल्यानंतर घरातल्या सुना काम नाही करणार. त्यांनी गीता बाली यांनाही सिनेमात काम करण्याची परवानगी दिली नाही.'Dhurandhar 2 Spoiler Alert : प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला! 'बडे साहब' म्हणजे दाऊद; सिनेमात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?'त्यावेळी मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचं होतं. लहानपणापासून मी स्विमिंग, डान्सिंग या सगळ्यात माहीर होते.' असं मुमताज यांनी पुढे सांगितलं.Maharashtrachi Hasyajatra फेम अभिनेत्याची स्वप्नपूर्ती! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेतलं नवीन घरअनेक अभिनेत्यांशी नाव जोडलं गेलंशम्मी कपूर व्यतिरिक्त, मुमताज यांचं नाव अभिनेते संजय खान, फिरोज खान आणि देव आनंद यांच्याशीही जोडलं गेलेलं. पण अखेरीस त्या मयूर वाधवानी यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी १९७४ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर मुमताज आपल्या पतीसोबत ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या.Revati Lele : सहा वर्षांपूर्वी अभिनेत्रीला टीव्हीवर पाहिलं, पहिल्याच भेटीत प्रेमात; नशिबानं जुळवली रेवती-कौशिकची साता जन्माची गाठमुमताजने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून केली. त्यांची आई नाझ, आणि मावशी यादेखील ज्युनियर आर्टिस्ट होत्या. कठोर परिश्रमाच्या जोरावर, मुमताज ज्युनियर आर्टिस्टपासून एका मोठ्या स्टारपर्यंत पोहोचल्या. मुमताज यांनी 'खिलौना', 'रोटी', 'आंधी और तूफान', 'जवान मर्द', 'रुस्तम-ए-हिंद' आणि 'दो रास्ते' यांसारख्या हिटचित्रपटांमध्येकाम केलं. 'खिलौना'मधील उत्कृष्ट अभिनयासाठी, मुमताज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मुमताजः बॉलीवूडचा सुपरस्टार तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो | Achira News