Achira News Logo
Achira News

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले

Maharashtra Times
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले
Full News
Share:

मुंबई -'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेनं नुकतीच मराठी अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्नगाठ बांधली. अपूर्वाने लग्नाच्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी दिलेली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अपूर्वा गोरेनं तिची आणि अंशुमनची लव्ह स्टोरी सांगितली आहे.अपूर्वा गोरेची लव्ह स्टोरीअपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी यांनी नुकतीच 'राजश्री मराठी'लामुलाखतदिली. यादरम्यान लव्ह स्टोरी सांगताना अपूर्वा म्हणाली की, 'माझं या क्षेत्रातील व्यक्तीसोबत लग्न नाही करायचं. त्यामुळे मी तसाच मुलगा बघत होते. आमची ऑनलाईन ओळख झाली आणि जेव्हा त्याने मला विचारलं भेटूयात का? तर आपण एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो, कधी ना कधी भेट होईलच त्यामुळे नाही नको म्हणायला, म्हणून मी भेटले. कुठेच माझ्या डोक्यात काही नव्हतं. मी त्याला सहज भेटायला गेले.'हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील दुष्यंत आणि कृष्णा सोबत रंगल्या गप्पामैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं'आम्ही पहिल्याच भेटीत सहा तास गप्पा मारल्या. त्याने मला माझे लग्नाबद्दलचे विचार विचारले. त्यानंतर त्याने मला घरी सोडलं. पाऊस पडत नव्हता त्यादिवशी आणि बरोबर माझ्या घराखाली आम्ही पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. तेव्हा असं झालं की, हाच संकेत असेल का? आम्ही फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती आहोत. पण, त्यादिवशी आम्ही संपूर्ण रात्र चॅट करत होतो. आम्ही आठवडाभर खूप बोललो. पण एकाचइंडस्ट्रीमध्येआहोत ही एक अढी होती. तसं मी त्याला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, 'आपलं लग्न होईल किंवा चांगली मैत्री होईल' आमची चांगली मैत्री झाली. त्यानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.' असं अपूर्वा पुढे म्हणाली.Reena Roy : विवाहित अभिनेत्याकडून विश्वासघात, नंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत लग्न अन् घटस्फोट; रीना रॉय यांचं चर्चित राहिलेलं वैयक्तिक आयुष्यदरम्यान, २०२५ मध्ये अंशुमन आणि अपूर्वा यांची पहिली भेट झालेली. त्यानंतरवर्षभरातचघरच्यांच्या संमतीनं अंशुमन आणि अपूर्वा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 'जरी कितीही अडचणी आल्या तरी मी अपूर्वासोबतच राहीन, अशी भावना माझ्या मनात निर्माण झालेली' असं अंशुमननं सांगितलं.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले | Achira News