Achira News Logo
Achira News

मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने दिग्दर्शक मंदार देवस्थला यांच्यासोबत काम करण्याबाबत केली चर्चा

Maharashtra Times
मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने दिग्दर्शक मंदार देवस्थला यांच्यासोबत काम करण्याबाबत केली चर्चा
Full News
Share:

मुंबई -मराठी इंडस्ट्रीमध्ये काही दिवसांपूर्वी एक वाद पुन्हा चर्चेत आलेला. तो म्हणजे शशांक केतकर आणि मंदार देवस्थळी यांचा. सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी ५ लाख रुपये थकवल्याचा आरोप शशांक केतकरने केला. शशांकने यापूर्वीही याप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली. मात्र, काही दिवसांपूर्वी अभिनेत्यानं पुन्हा फसवणुकीच्या संदर्भात व्हिडिओ शेअर केलेला. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.Lagnanantar Hoilach Prem : 'हरलो मी...' जीवाचे सगळे प्रयत्न पाण्यात; पसारेवाल्याने आटापिटा करूनही नंदिनीचा मूर्खपणा, आयत्या वेळी मारली पलटीनंदिता पाटकरनं सांगितला कामाचा अनुभवमराठी अभिनेत्रीनंदिता पाटकरने मंदार देवस्थळी यांच्या 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारलेली. नुकत्याच 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नंदिताला मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारला. मुलाखतीदरम्यान, 'आता जो वाद गाजतोय, त्याच्याकडे पण तू काम केलेलं आहेस. 'माझा पती सौभाग्यवती' मध्ये. तुझा अनुभव कसा होता?' असा प्रश्न विचारला असता नंदिता म्हणाली की, 'माझा अनुभव चांगला होता. कारण, तेव्हा काही प्रॉब्लेम्स नव्हते त्याचे. त्याचं प्रोडक्शन होतं ते आणि मी त्याच्याच मालिकेत काम केलं. खरंतर मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. माझी पहिली मालिका होती ती. मला मालिकेचा काहीच अनुभव नव्हता.''जसे, परेश मोकाशी माझे पहिले दिग्दर्शकसिनेमाचे,तसं मंदार देवस्थळी माझा पहिला दिग्दर्शक मालिकेतला आणि मला खूप छान शिकायला मिळालं त्याच्याकडून. कारण, तो अत्यंत क्रिएटीव्ह दिग्दर्शक आहे. नेहमी, चला उठा आणि सीन करा, असं नाही. तो नाटकाच्या पद्धतीने एखाद्या सीमचं तालीम घेणार, इकडे जाऊया, असं छान कोरिओग्राफ करून, मग त्याचे इमोशन्स कसे आणायचे. हे त्यांनी शिकवलं. इंटरेस्टिंग काम करतो तो. तेव्हा त्याच्याही मालिका, सिनेमे सुरू होते. मुद्दाम असं कोण करेल, मला नाही वाटत.' असं नंदिताने पुढे सांगितलं.मराठी भाषा दिन : 'पैठणी' कविता म्हणताना भूतकाळात रमून गेली अभिनेत्री नंदिता पाटकरनंदिता पाटकरचे सिनेमेदरम्यान, नंदिता पाटकरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं 'बालभारती', 'एलीझाबेद एकादशी', 'पंचक', 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लालबागची राणी' यांसारख्यासिनेमांमध्येकाम केलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने दिग्दर्शक मंदार देवस्थला यांच्यासोबत काम करण्याबाबत केली चर्चा | Achira News