मराठी माणसांचा नव वर्षांचा दिवस म्हणजे गुढी पाडवा. आज 19 मार्च 2026 रोज हा सण महाराष्ट्रात मोठ्या दणक्यात साजरा होईल. बऱ्याच घरांमध्ये गुढी उभारुन, गोडाधोडाच्या पदार्थांसह या नववर्षाचे स्वागत केले जाते. ठिकठिकाण शोभायात्रा निघतात. टीव्ही आणि सिनेमांमध्ये काम करणारे कलाकार बरेचदा शूटिंगनिमित्त घरापासून दूर राहतात. पण या नववर्षाच्या स्वागतानिमित्त ते आपल्या घरी जाऊन साजरा करतात. किंवा सुट्टी मिळाली नाही तरी आपापल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतात.झी मराठीचे कलाकारसुद्धा यात मागे नाही.नुकत्याच सुरू झालेल्या सनई चौघडे मालिकेत मेघना एरंडेने बऱ्याच दिवसांनी पुनगारमन करत आहे. या मालिकेत ती पमा परब हे पात्र साकारत आहे, मेघनाने तिच्या गुढीपाडव्याच्या आठवणी सांगितल्या:"मी दरवर्षी घरीच गुढी पाडवा साजरा करत होते, पण यावर्षी मी झी मराठी आणि ‘सनई चौघडे’च्या कुटुंबासोबत हा सण साजरा करणार आहे. आम्ही सर्व एकत्र डोंबिवली शोभायात्रेत सहभागी होणार आहोत. आमची मालिका गुढी पाडव्याच्या आठवड्यात सुरू झाली आहे, त्यामुळे प्रेक्षकांसोबत हे नवीन वर्ष साजरे करण्याचा उत्साह दुप्पट आहे. या नववर्षाचा माझा संकल्प म्हणजे आमच्या नवीन मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांचे प्रेम मिळवणे. आमच्या घरी मी आणि माझ्या सासूबाई पहाटे उठून गुढी उभारतो. आमच्याकडे बायकांचेच राज्य असल्यामुळे गुढीसाठी कोणता शेंडा आणि कोणती साडी लावायची हे आम्ही ठरवतो. आमच्याकडे एक खास काठी आहे जी फक्त गुढी उभारण्यासाठीच वापरली जाते. आमच्या बाल्कनीत बरीच जागा आहे जिथे आम्ही गुढी उभारून पूजा करतो. त्या दिवशी सुग्रास जेवण असते. यावर्षी मी पहिल्यांदाच शोभायात्रेत सहभागी होणार आहे. त्यानंतर ‘सनई चौघडे’च्या टीमसोबत दुपारचे जेवण करणार आहे. माझ्यासाठी हे नववर्ष एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, भरभराट, शांतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही सदिच्छा."Farah khan father :' त्यांना मुलगा हवा होता,' 'एका चित्रपटामुळं होत्याचं नव्हतं झालं', वडील कामरान खान यांच्याबद्दल काय म्हणाली फराह खान?शुभ श्रावणी मालिकेत श्रावणी हे पात्र साकारणारी वल्लरी विराज हिने गुढी पाडव्याच्या आठवणी सांगितल्या :"गुढी पाडव्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत‘शुभ श्रावणी’च्या सहकलाकारांसोबत सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना भेटण्याची ही एक संधी असते आणि नववर्ष त्यांच्यासोबत साजरे करण्याचा अनुभव खूप सुखद असतो. शोभायात्रे मधला लोकांचा उत्साह पाहण्यासारखा व अनुभवण्यासारखा असतो. मी ही छान पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत जाणार आहे. माझ्या घरीही तितक्याच उत्साहाने गुढी पाडवा साजरा केला जातो. आम्ही एकत्र गुढी उभारतो आणि आई मस्त बासुंदी पुरीचं जेवण बनवते.जुई गोगरी (आसावरी), सनई चौघडे :"सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षीपासून आम्ही घरी गुढी उभारणार आहोत. मी दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेत जाते आणि मला ती खूप आवडते, कारण तिथे आपली माणसं एकत्र आली आहेत असे वाटते. गुढी पाडवा म्हटलं की गोड जेवण असायलाच पाहिजे, गुळपोळी, श्रीखंड-पूरी, बटाट्याची भाजी, वरण-भात, भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं असा एक छान बेत असतो. दरवर्षी मी देवळात जाऊन बाप्पाचा आशीर्वादही घेते."Sagar Karande : 'मिटिंगला गेलेलो तेव्हा मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या बड्या दिग्दर्शकाने मला हाकलवलं' सागर कारंडेनं सांगितला प्रसंगकमळी मालिकेतील विजया बाबर (कमळी) :"यावर्षी मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. आणि नंतर दरवर्षीप्रमाणे मी गावी जाणार आहे. गुढी पाडव्याच्या नंतर जो शनिवार येतो, त्या दिवशी आमच्या गावात ग्रामदेवता जानुबाईची जत्रा असते, त्यासाठी आम्ही सर्व जातो. यावर्षी एक खास गोष्ट म्हणजे, मागच्या वर्षी जत्रेसाठी गावी गेले असताना, ज्या दिवशी जत्रा होती त्याच दिवशी मला ‘कमळी’साठी कॉल आला होता. तेव्हा मी मनात इच्छा व्यक्त केली होती की हे काम मिळावे, आणि ते झाले म्हणून यावेळी आभार मानणार आहे. आमच्याकडे आजी गुढी उभारायची. मी सातारची असल्यामुळे घरी पुरणपोळी, गुळवणी आणि कटाची आमटी असतेच. मला ढोल-ताशा पथक खूप आवडतात, शोभायात्रेबद्दल खूप उत्सुक आहे. सर्व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा."कलाकारांनी प्रेक्षकांना दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !जसे हे कलाकार आपल्या खासगी आयुष्यात गुढी पाडवा साजरा करतात, तसेच झी मराठीवरील लक्ष्मी निवास , कमळी , वीण दोघातली ही तुटेना, शुभ श्रावणी आणि तुला जपणार आहे मालिकांमध्ये सुद्धा गुडीपाडव्याचा उत्साह बघायला मिळणार आहे. ‘तुला जपणार आहे’ मालिकेत मीरा आणि अथर्व आपल्या संपूर्ण परिवारासोबत गुढी उभारणार आहेत. ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत समर–स्वानंदी आणि रोहन–अधिराचा आणि लक्ष्मी निवास मालिकेत सिद्धू आणि भावनाचा हा पहिला गुढी पाडवा असून तोही खास असणार आहे.
मराठी कलाकारांनी कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत गुढीपाडवा साजरा केला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.