Marathi Entertainment News :मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर त्यांच्या परखड स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा मराठी तारका हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या विविध अनुभवांवर ते उघडपणे बोलतात. नुकतंच त्यांनी एका अभिनेत्रीवर धक्कादायक खुलासा केला.राजश्री मराठी चॅनेलला नुकतीच त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टविषयी प्रश्न विचारण्यात आला होता ज्यात त्यांनी एका मराठी अभिनेत्रीने त्यांना ओळख दाखवली नाही असं लिहीलं होतं. ती अभिनेत्री कोण हे त्यांनी या मुलाखतीत उघड केलं.महेश टिळेकर म्हणाले की,"त्या अभिनेत्रीने आमच्याबरोबर काम केलं होतं. मी मराठी तारका हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हासुद्धा त्या आल्या होत्या. त्यानंतर अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक कार्यक्रम केला. आता मी तुमच्यासमोर नावच घेतो अश्विनी भावे.""माझी अशी इच्छा होती की अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे तर त्यांनी त्या कार्यक्रमाला यावं. वर्षा उसगांवकरसुद्धा आल्या होत्या. मी अश्विनी यांना मेसेज केला. त्यावर उत्तर नाही, फोन केल्यावरही काहीच प्रतिसाद नाही. दोन दिवसांनी मॅनेजरने फोन केला. तिने म्हटलं "मॅमनी विचारलंय काय काम आहे ?" मी तिला म्हणालो "मी मॅमशी बोलेन. तुझ्याशी का बोलू ?" कारण आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यात आम्ही एका इंडस्ट्रीत काम करतो. त्यात तुम्ही जर मॅनेजर दाखवणार असाल तर मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो. तुम्ही मोठे तुमच्या घरी. त्यांच्यापेक्षा दिग्गज लोकांबरोबर माझं काम करून झालंय. हे त्यांना सुद्धा समजायला हवं. कारण मेसेज करताना मी खाली महेश टिळेकर हे नाव सुद्धा लिहिलं होतं."
मराठी निर्मात्याने त्याला ओळखण्यात अपयशी ठरलेल्या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक सत्य उघड केले
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.