बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेदीपिका पादुकोण.आपल्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहवणारी दीपिका सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. मुलगी दुआ हिच्या जन्मानंतर दीपिकाचे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने एक आई म्हणून तिचे काही खास आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 'हार्पर बाजार इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने एक अतिशय मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, "सध्या माझी मुलगी 'दुआ' हीच माझी सर्वात मोठी आवडती आहे. एकदा माझ्या बॅगेत मला दोन दिवसांपूर्वीचा थेपल्याचा तुकडा सापडला, जो दुआ खात होती". दीपिकाने सांगितले की, ती आपल्या मुलीसोबत तासनतास वेळ घालवते. ती दुआला सतत "आय लव्ह यू" म्हणत असते. इतकंच नाही तर, लेकीचं मनोरंजन करण्यासाठी दीपिका चक्क लहान मुलांची 'हेड, शोल्डर, नीज अॅण्ड टोज' सारखी गाणीही विनोदी पद्धतीने गाते. या लहान लहान गोष्टींमुळे दोघींचं नातं अधिक घट्ट होत असल्याचं दीपिकानं सांगितलं. नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाने लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर, २०२४ मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर या जोडप्याने आपल्या मुलीचं नाव 'दुआ' असल्याचं जाहीर करत तिचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
मुलगी दुआसोबत दीपिका पदुकोणचे हृदयस्पर्शी बंधः मातृत्वाची एक झलक
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.