Achira News Logo
Achira News

मालमत्ता कराच्या थकबाकीवरून कुपवाड हायस्कूलचे कार्यालय सील

Pudhari
मालमत्ता कराच्या थकबाकीवरून कुपवाड हायस्कूलचे कार्यालय सील
Full News
Share:

महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार कुपवाड शहरातील एका हायस्कूलचे कार्यालय मालमत्ता कर थकबाकीपोटी महापालिका प्रशासनाने शनिवारी सायंकाळी सील केले. संबंधित संस्थेकडे 4 लाख 73 हजार 98 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. सदर संस्थेला महापालिका प्रशासनाने यापूर्वी अनेकदा कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयुक्त गांधी यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. पथकाने संस्थेचे कार्यालय आणि स्टाफरूम अधिकृतपणे सील केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मालमत्ता कराच्या थकबाकीवरून कुपवाड हायस्कूलचे कार्यालय सील | Achira News