Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026:10 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के

Maharashtra Times
महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026:10 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के
Full News
Share:

Maharashtra HSC Result 2026:बारावीच्या निकालामध्ये १०० टक्के यशाची पताका फडकवणाऱ्या महाविद्यालयांची चर्चा सुरू असताना मुंबई विभागातील १० कनिष्ठ महाविद्यालयांवर 'शून्य टक्के' निकालाची नामुष्की ओढवली आहे. यामध्ये तीन महाविद्यालयांचा संपूर्ण निकाल शून्य टक्के लागला असून सात महाविद्यालयांतील विशिष्ट शाखांमधून एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. शून्य टक्के निकाल लागणाऱ्या १० संस्थांपैकी सर्वाधिक चार शिक्षणसंस्था ठाणे जिल्ह्यातील आहेत. मात्र रायगड जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.महाविद्यालयांचा निकाल किती टक्के लागतो, यावर त्यांच्या शैक्षणिक दर्जाची परीक्षा होते. प्रवेश घेतानाही संबंधित विद्यार्थी महाविद्यालयाचा निकाल किती टक्के लागला आहे, यावरून त्याचा दर्जा ठरवतात. त्यामुळे अशा शून्य निकालामुळे संबंधित संस्थांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात एका महाविद्यालयाचा संपूर्ण निकाल शून्य टक्के लागला, तर चार महाविद्यालयांतील काही शाखांना खाते उघडताही आले नाही. पालघरमध्येही एका महाविद्यालयाचा पूर्ण निकाल शून्य टक्के लागला असून चार महाविद्यालयांतील काही शाखांचा निकाल शून्य टक्के आहे. मुंबई शहरात एका महाविद्यालयाला हा धक्का बसला; मात्र मुंबई उपनगर आणि रायगडमध्ये अशी वेळ कोणत्याही संस्थेवर आली नाही.ठाण्यात 'शाखानिहाय' घसरणठाणे जिल्ह्यातील अंबाडी येथील गुरुकुल विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतून एकमेव विद्यार्थी परीक्षेला बसला. तो अनुत्तीर्ण ठरल्याने शाखेचा निकाल शून्य टक्के लागला. पिंपळास येथील सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान शाखेतून एकच विद्यार्थी बसला आणि तोही अपयशी ठरला, तर वाणिज्य शाखेने मात्र यश मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतील तिन्ही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली, तर विज्ञान शाखेतील १० पैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कल्याणमधील आर. के. रात्र कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतील दोन्ही विद्यार्थी अपयशी ठरले, मात्र कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. जे. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान व वाणिज्य शाखांनी शंभर टक्के निकाल नोंदवला; मात्र कला शाखेतून एकमेव विद्यार्थी नापास ठरल्याने त्या शाखेचा निकाल शून्य टक्के राहिला.HSC Result Toppers Story: आई-वडील नाहीत, वसतिगृहात झाडू मारला अन् बागकाम केलं; संभाजीनगरच्या 'दत्तू'ची बारावीत दैदीप्यमान झेप!पालघरमध्येही समान चित्रपालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील भगवान बिरसा मुंडा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे टेक्निकल सायन्समधील एकमेव विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरल्याने संस्थेचा निकाल शून्य टक्के लागला. शारदा कनिष्ठ महाविद्यालय येथे कला शाखेचा निकाल शून्य टक्के आहे, तर वाणिज्य (६७.९० टक्के) आणि विज्ञान (८५.५० टक्के) शाखांनी समाधानकारक कामगिरी केली. लॉर्ड्स इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे कला शाखेतील चारही विद्यार्थी अपयशी ठरले; विज्ञान (५०.३९ टक्के) आणि वाणिज्य (२७.५२ टक्के) शाखांनी मर्यादित यश मिळवले. श्री गजनंद सिंग हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथेही कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला, तर विज्ञान (८९.५९ टक्के), वाणिज्य (७९.६८ टक्के) शाखांनी चांगली कामगिरी नोंदवली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026:10 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के | Achira News