Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र कुस्ती अजिंक्यपद स्पर्धाः अजितदादा पवार क्रीडागारातील निराशाजनक आणि प्रभावी कामगिरी

Maharashtra Times
महाराष्ट्र कुस्ती अजिंक्यपद स्पर्धाः अजितदादा पवार क्रीडागारातील निराशाजनक आणि प्रभावी कामगिरी
Full News
Share:

पुणे :महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा अजितदादा पवार क्रीडानगरीत सुरू आहे. महाराष्ट्र केसरी गटातील माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत सोलापूरच्याच विशाल बनकरचा ६-१ असा पराभव केला. यानंतर अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे याला कमी उंचीच्या आणि महाराष्ट्रातील कुस्तीत चपळ चित्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या बाळू बोडके याने अत्यंत चुरशीच्या लढतीत १०-५ अशा गुणाधिक्याने पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले.संपूर्ण देशात आपल्या कुस्ती कौशल्याने धुमाकूळ घालणाऱ्या आणि हिंगोलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यासिकंदर शेखनेपहिल्या फेरीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून पुण्याच्या अनिकेत मांगडेचा ८-१ असा पराभव केला. यानंतर कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेने ठाण्याच्या कुमार पाटीलचा ६-०, सोलापूरच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या तेजस मोरेचा १२-०, रत्नागिरीच्या संतोष दोरवडने पिंपरी-चिंचवडच्या समाधान दगडेचा १०-० असा पराभव केला. पुण्याच्या सागर देवकातेने यवतमाळच्या शुभम जाधवला चीतपट केले.Gautam Gambhir: गौतम गंभीरची हायकोर्टात धाव; 2.5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीमहाराष्ट्र केसरी गटात गादी विभागातील पहिल्या फेरीत मूळचापुण्याचा; पण वाइल्ड कार्डच्या माध्यमातून नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या प्रतीक जगतापचा १०-० अशा गुणाधिक्याने पराभव करून विजय सलामी दिली. कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने पालघरच्या वैभव मानेचा १०-०, तर नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने मूळचा पुण्याचा; पण बीडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतीक देशमुखचा १०-०, तर गत वेळचा महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा पृथ्वीराज मोहोळ याने जालन्याच्या अरुण चरावडेचा १०-० अशा गुणाधिक्याने पराभव केला. गडचिरोलीच्या संग्राम पाटीलने वाशिमच्या आदित्य मोहोळचा ७-३ असा पराभव केला, तर साताऱ्याच्या दिग्विजय जाधवने जळगावच्या स्वप्नील पाटीलला चीतपट केले. पुणे शहराच्या श्रेयस होळकरने कोल्हापूरच्या ओंकार पाटीलचा ११-० असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.IPL 2026 : राजस्थानसाठी 11 वर्ष देणारा संजू आता चेन्नईकडे; नवीन कॅप्टन पराग म्हणतोय, संजूला विराट, रोहितप्रमाणे पर्यायच नाहीइतर निकाल५७ किलो माती विभाग -कोल्हापूरच्या मृणाल पाटील याने पुण्याच्या ओंकार निगडेचा ४-२ असा पराभव करून सुवर्णपदक मिळवले. कोल्हापूरच्या सुदर्शन पाटील सोलापूरचे अजय निंबाळकरचा ९-४ असा पराभव करून ब्राँझपदक पटकावले. ८६ किलो - माती विभाग - अंतिम फेरीत सोलापूरच्या मशीद शेखने पुणे शहराच्या चंद्रहार नरळेचा ८-२ अशा गुणाधिक्याने पराभव सुवर्णपदक पटकावले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र कुस्ती अजिंक्यपद स्पर्धाः अजितदादा पवार क्रीडागारातील निराशाजनक आणि प्रभावी कामगिरी | Achira News