पुणे: पुण्यातील वाघोली येथे ६८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा २०२६ सुरू आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आज तिसऱ्या दिवशी मोठ्या मल्लांच्या लढती रंगणार आहेत. हर्षवर्धन सद्गीर, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी पहिल्या कुस्त्या जिंकत विजयी सलामी दिली. माऊलीने मात्र निराशा केली. चपळ चित्यासारखा खेळणार कमी उंचीचा बाळू बोडकेने त्याला पराभूत केले. तर दुसरीकडे महेंद्रनेही विशाल बनकर याला हरवत मैदान मारलं. आजच्या होणाऱ्या लढतींमधील मनीष रायते (पुणे शहर) विरुद्ध सिकंदर शेख (हिंगोली), सागर देवकाते (पुणे जिल्हा) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा), बाळू बोडके (नाशिक) विरुद्ध विक्रमसिंग भोसले (गडचिरोली) लक्षवेधी असणार आहेत. तर गादी विभागातील पृथ्वीराज मोहोळ (पुणे अ) विरुद्ध धिरज बारस्कर (धाराशिव), हर्षवर्धन सदगीर (नाशिक) विरुद्ध वेताळ शेळके (अमरावती) आणि श्रेयस होळकर (पुणे शहर) विरुद्ध शिवराज राक्षे (नांदेड) या लढतींकडे सर्वांच्या नजरा आहेत.महाराष्ट्र केसरी गटाच्या माती विभागातील लढती१) रविराज चव्हाण (सोलापूर शहर) विरुद्ध शिवराज लोकरे (धाराशिव)२) संतोष दोरवड (रत्नागिरी) विरुद्ध शुभम शिंदनाळे (कोल्हापूर जिल्हा)३) सागर देवकाते (पुणे जिल्हा) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा)४) इम्रान मुजावर (सांगली ) विरुद्ध सिद्धेश पाटील (कल्याण)५) मनीष रायते (पुणे शहर) विरुद्ध सिकंदर शेख (हिंगोली)६)बाळू बोडके(नाशिक) विरुद्ध विक्रमसिंग भोसले (गडचिरोली)७) शशिकांत जामाळे (नंदुरबार) विरुद्ध सुदर्शन कोतकर (अहिल्यानगर)८) रामचंद्र कांबळे (भंडारा) विरुद्ध तुषार ठोंबरे (सातारा)Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीमध्ये मोठा उलटफेर, बाळू बोडकेने जमदाडेला लोळवलं, सिकंदर, पृथ्वीराज, शिवराजची विजयी सलामीमहाराष्ट्र केसरी गटाच्या गादी विभागातील लढती१) सिध्दांत गवई (अकोला) विरुद्ध संग्राम पाटील (गडचिरोली)२) पृथ्वीराज मोहोळ (पुणे अ) विरुद्ध धिरज बारस्कर (धाराशिव)३) दिग्विजय जाधव (सातारा) विरुद्ध गजानन भोयर (हिंगोली)४) जय पाटील (सोलापूर शहर) विरुद्ध चेतन रेपाळे (अहिल्यानगर)५) श्रेयस होळकर (पुणे शहर) विरुद्ध शिवराज राक्षे (नांदेड)६) सत्पाल शिंदे (सांगली) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)७) हर्षवर्धन सदगीर (नाशिक) विरुद्ध वेताळ शेळके (अमरावती)८) अक्षय मंगवडे (सोलापूर) विरुद्ध सुशांत तांबुळकर (कोल्हापूर)
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची पुण्यात जोरदार सुरुवात, अव्वल कुस्तीपटूंच्या विजयाची सुरुवात
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.