Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य बायोपिकवर चर्चा

Loksatta
महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य बायोपिकवर चर्चा
Full News
Share:

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या १५ जानेवारीला राज्यात मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचाराच्या तोफा १३ तारखेच्या संध्याकाळी थंडावतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेल या ठिकाणी मुलाखत पार पडली. प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जर बायोपिक आला तर नाव काय असेल आणि भूमिका कोण करेल ते सांगितलं. तुमच्यावर जर बायोपिक आला तर नाव काय असेल आणि कोण भूमिका करेल? असं प्रसाद ओक आणिअमृता खानविलकरयांनी विचारलं तेव्हादेवेंद्र फडणवीसयांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्यावर बायोपिक आला तर त्याचं नाव आपला देवाभाऊ असेल, तसंच या चित्रपटात माझी भूमिका कोण करेल मला माहीत नाही पण प्रसाद ओक तयार असतील मला ठाऊक आहे की ते उत्तमरित्या माझं काम करु शकतील. त्यावर प्रसाद ओक म्हणाले की मला माझा जनसंपर्क तुमच्याइतका वाढवावा लागेल या प्रश्नोत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसंच या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंडही चांगलाच चर्चेत राहिला. विकास की पर्यावरण? देवेंद्र फडणवीस : पर्यावरणपूरक विकास धर्म की कर्तव्य? देवेंद्र फडणवीस : आपल्या धर्मातच सांगितलं आहे, गीतेतच सांगितलं आहे की कर्तव्य हेच धर्म आहे. शहरं कशी असायला हवीत लिव्हेबल की लव्हेबल? देवेंद्र फडणवीस : शहरं लिव्हेबल आधी करावी लागतील, तशी झाली की आपोआप लव्हेबल होतील. फिल्मसिटी की आयटी सिटी? देवेंद्र फडणवीस : फिल्मसिटीमध्ये आपण आयटी सिटी करतो आहोत. आता फिल्म पोस्ट प्रॉडक्शन झाली आहे. घरी गेल्यानंतर राजकारणावर चर्चा होते की संगीतावर?देवेंद्र फडणवीस : राजकारणावर चर्चा मुळीच होत नाही. संगीतावर चर्चा होत असते, त्यात मला हे सांगितलं जातं की तू बेसुरा आहेस तू गाऊ नकोस, मी गाणार. आमचा एक अलिखित करार आहे की मला हजारो गाणी पाठ आहेत, मला सूर नाहीयेत. माझ्या बायकोला सूर आहे, तिला कडवी पाठ नसतात. सूरात गाणारी ती आणि शब्द सांगणारा मी. असा आमचा सूरसंगम आहे. मिसळ की मच्छी? देवेंद्र फडणवीस : मी कोल्हापूरहून आलोय त्यामुळे मिसळच. अशी खास आणि दिलखुलास उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. तुमच्या स्वप्नातलंपनवेलआपण घडवून दाखवू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य बायोपिकवर चर्चा | Achira News