Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली

Lokmat
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला असून सर्वात कमी राहिला आहे. शाखानिहाय निकाल विज्ञान८६.४४%कला७८.०२%वाणिज्य८७.०३%व्यवसाय अभ्यासक्रम८२.७४%आयटीआय८३.७८%२६ विषयांचा निकाल १००% राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे. यंदाचा निकाल- ८९.७९%गतवर्षीचा निकाल- ९१.८८%घट२.०९%विभागनिहाय निकालकोकण९४.१४%पुणे९१.२५%अमरावती२०.९२%नाशिक९०.७२%मुंबई९०,०८%कोल्हापूर८९.९७%छत्रपती संभाजीनगर८८.६८%नागपूर८८.६७%लातूर८४.१४%उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३ मे ते १७ मेपर्यंत मुदत बारावीच्या निकालानंतर गुण पडताळणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ३ ते १७ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. निकालानंतर नवी मुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा असा जल्लोष केला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर, मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली | Achira News