Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र हवामानः राज्यात उष्णतेची लाट आणि मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Times
महाराष्ट्र हवामानः राज्यात उष्णतेची लाट आणि मुसळधार पावसाची शक्यता
Full News
Share:

मुंबई:महाराष्ट्रात मे महिन्यात हवामान सतत बदलत आहे. काही जिल्ह्यात नागरिक उष्णतेची लाट आणि उष्मघाताने त्रासले आहेत. तर इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी, 4 मे रोजी, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहणार आहे.कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4 मे रोजी, 11 जिल्ह्यांनापावसासाठी अलर्टदेण्यात आला आहे. विदर्भात येत्या 24 तासांत वादळी वारे वाहून त्यासह पावसाची शक्यता आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर चार जिल्हे ऑरेंज अलर्टखाली आहेत. या भागांमध्ये पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून अनेक भागात वीज आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळसह अमरावती विभागात मेघगर्जनेसहहलका ते मध्यम पाऊसपडण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील तापमान सर्वाधिक असून कमाल तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान असते. दरम्यान, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ, वारे आणि वीजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मुंबईत उष्णता कायमदरम्यान,मुंबई, ठाणे, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह कोकणात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सियस ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. दुपारच्या वेली उष्णता तीव्र राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये दिवसाचे तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र हवामानः राज्यात उष्णतेची लाट आणि मुसळधार पावसाची शक्यता | Achira News