मुंबई:महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरणात मोठे बदल दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावासाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या आठवड्यासाठी हवामान विभागाने काय संकेत दिले आहेत ते जाणून घेऊया.राज्यात पुढील काही दिवसांत वातावरण झपाट्यानं बदलणार असून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज दिवसभरात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अरबी समुद्रातूनकोकण किनारपट्टीवर येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. यामुळेच पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.Union Budget 2026: मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांना जोडणार 7 नव्या हाय-स्पीड ट्रेन, रेल्वे नेटवर्कचा विस्तार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणाकिमान तापमानात वाढहवामान विभागाच्या मते, आता पावसासाठी वातावरण अनुकूल झालं आहे. राज्याभरीतल किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून येत्या काही दिवसांत थंडीचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.मुंबईमध्येपहाटे धुक्याची स्थिती दिसून येत असून दिवसभर आकाश निर्भ्र राहणार आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सियस राहून किमानतापमान 23 अंश सेल्सियस असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात वातावरण आठवडाभर कोरडं राहणार असून, पुण्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सियस तर किमान तापमान 15 अंश सेल्सियस असणार आहे. मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सियस असून, किमान तपामान 17 अंश सेल्सियस राहणार आहे.Vadhavan Airport: समुद्रातील पहिलं विमानतळ मुंबईजवळ उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे अद्याप प्रस्ताव नाहीच; कारण काय?यलो अलर्ट कुठे?हवामान विभागानं जळगाव, नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. नाशिकमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सियस असून किमान तापमानाचा पारा वाढून 18 अंश सेल्सियसवर पोहचला आहे. विदर्भातही थंडीचा कडाका कमी झाला असून,नागपूरमध्ये कमाल तापमान31 अंश सेल्सियस असून, किमान तापमान 14 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे.
महाराष्ट्रात हवामानाचा इशाराः मुंबई, ठाणे आणि इतर भागात अवकाळी पावसाची शक्यता
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.