Achira News Logo
Achira News

महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी भारताने हवामानाचा इशारा जारी केला

Lokmat
महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी भारताने हवामानाचा इशारा जारी केला
Full News
Share:

पुणे-हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांसाठी इशारा देण्यात आला असून, पुढील दोन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागातील अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि आसपासच्या जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबतच सोसाट्याचा वारा, गारपीट आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील २४ तासांत धाराशिव आणि विदर्भातील काही भागांत गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही परिस्थिती २० मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र वातावरणात सुधारणा होऊन आकाश निरभ्र राहील आणि तापमानातही स्थिरता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी भारताने हवामानाचा इशारा जारी केला | Achira News