मुंबई:फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच महाराष्ट्रत गारठा कमी होत असल्याचं जाणवू लागलं असून कोकण किनारपट्टीवरील वातावरण दमट होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये आज दिवसभार वातावरण उष्ण राहील असा अंदाज हवामान विभागानं काल वर्तवला होता. काही ठिकाणी तर पारा 34 अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरणगेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांतपावसाचा इशारादेण्यात आला असून, ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येते काही दिवस हवामान स्थिर राहून फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.Mumbai Pune Expressway : वाहनावरील नियंत्रण सुटलं, आडोशी बोगद्याच्या तोंडाशी टँकर पलटी, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग कोणता?आज उष्ण वातावरणमुंबईत आज 2026मधील सर्वाधिक उष्ण वातावरणाची नोंद होण्याची शक्यता आहे. सांताक्रूझसह दक्षिण मुंबईतील काही ठिकाणी तापमानाचा पारा 34 अंश सेल्सियसवर पोहचणार असून, येत्या काही दिवसांत उष्ण वातावरण कायम राहण्याची चिन्हे आहेत. तसेच, पहाटेच्या वेळेत शहरातील अनेक भागांत धुक्याची चादर पसरत असून, दृष्यमानता कमी होत आहे.उत्तर भारतात थंडीचा कडाकाकेंद्रीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली या ठिकाणी गारठा वाढत असून काही राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी बर्फवृष्टीसुद्धा होत आहे. त्याचवेळी दक्षिण भारतात उकाडा वाढत असल्याची चिन्ह आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर ढगाळ वातावरणासह मुसाळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.Belasis Flyover: वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्याचा डंका, दक्षिण मुंबईतील कोंडी फोडणारा उड्डाणपूल तयार; तरी उद्घाटन का लांबणीवर?येत्या 24 तासांत राज्यातीलहवामान स्थिर राहूनउकाडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असून आज सकाळी AQI 280 वर होतं. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं अवाहान केलं गेलं आहे. वाढत्या प्रदुषणामुळे काही मुंबईकरांना श्वास घेण्यात त्रास होत असून, आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या तापमानमुळे हवेची गुनवत्ता सुधारण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील तापमान आणि आर्द्रता पातळीः उष्ण हवामानाचा अंदाज
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.