पुणे :राज्यात गेल्या पाच वर्षांत बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याची संख्या सुमारे ७० हजारांनी कमी झाली आहे, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही साधारण अडीच हजारांची घट झाली आहे. त्या तुलनेत पाच वर्षांत सरकारी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागा जैसे-थे असून, त्यात खासगी विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी चुरस कमी राहणार असून, इच्छित अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांना धावपळ करावी लागणार नाही, असे चित्र आहे.राज्य मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. यामध्ये उत्तीर्णांचे प्रमाण ८९.७९ टक्के (१२,८६,८४३) असून, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी घटले आहे. मंडळाने २०२२ मध्ये घेतलेल्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्णांचे प्रमाण ९४.२२ टक्के (१३,५६,६०४) होते. त्यामुळे २०२२ ते २०२६ अशा पाच वर्षांचा कालावधी घेतल्यास, उत्तीर्णांचे प्रमाण ४.४३ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६९ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी कमी आहे. या निकालाचा अभ्यास केल्यास ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या १० हजार ४७हून सात हजार ५१०पर्यंत घसरली आहे. या तुलनेत राज्यातील सरकारी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. खासगी विद्यापीठांची संख्या वाढल्याने, त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहेत.निकालात प्राविण्यसह उत्तीर्ण; तसेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नामांकीत कॉलेजांमध्येही कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी फार चुरस राहणार नाही, असे चित्र आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये यंदा विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अवघड असल्याचे चित्र आहे.UGC NET June 2026 Exam: यूजीसी नेट परीक्षेची घोषणा! अर्ज प्रक्रिया सुरू, 'हे' दोन नवीन विषय समाविष्ट; जाणून घ्या पात्रता आणि महत्त्वाच्या तारखायंदाच्या निकालात उत्तीर्णांची संख्या घटल्याने दर वर्षीपेक्षा चुरस कमी राहील. या निकालात प्रावीण्यासह उत्तीर्ण किंवा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध आहेत.- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंडराज्यात पारंपरिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये प्रवेशक्षमता पुरेशा प्रमाणात आहे. पारंपरिक अभ्यासक्रम असले तरी नामांकित कॉलेजांना प्रवेशांना फारशी अडचण नाही. यंदा निकाल घटल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळू शकतो.- डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय
महाराष्ट्रातील बाराव्या इयत्तेच्या परीक्षांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आणि उच्च गुणांमध्ये घट
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.