Achira News Logo
Achira News

महाराष्ट्रातील संगोला येथील बोर्डाच्या कोठडीतील स्ट्रॉंगरूममधून प्रश्नपत्रिका चोरल्या गेल्या

Lokmat
महाराष्ट्रातील संगोला येथील बोर्डाच्या कोठडीतील स्ट्रॉंगरूममधून प्रश्नपत्रिका चोरल्या गेल्या
Full News
Share:

सांगोला (जि.सोलापूर) : सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथील बोर्ड कस्टडी स्ट्राँगरूम फोडण्यात आली असून बुधवारी होणाऱ्या दहावीच्या भूगोल विषयाच्या सुमारे ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे येथील सीसीटीव्ही बंद होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीचीपरीक्षासुरू असून बुधवारी, १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने बोर्ड कस्टडीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या बोर्ड कस्टडी रूममध्ये प्रश्नपत्रिका पत्र्याच्या पेटीत ठेवून दरवाजाला बाहेरून कुलूप लावून सील केले होते. पोलिस व दोन होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अज्ञात इसमाने कटरच्या साह्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पेटी क्र. ५४४९ मधील भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरल्या. तिथून जाताना दरवाज्याच्या कुलूपाला पुन्हा आहे तसा कागद गुंडाळून तेथून धूम ठोकली. गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक निलंबित : या प्रकरणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड या दोघांना निलंबित केल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्रातील संगोला येथील बोर्डाच्या कोठडीतील स्ट्रॉंगरूममधून प्रश्नपत्रिका चोरल्या गेल्या | Achira News