Ashok Kharat Latest News : हायप्रोफाइल ज्योतिषी व स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात महिला अत्याचार व जादूटोण्याचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर आता खरात याच्या कारनाम्यांची चर्चा सिन्नर तालुक्यात रंगू लागली आहे. दरम्यान, बुधवारी (१८ मार्च) रात्री क्राईम ब्रँचने मिरगाव येथील खरातच्या बंगल्यावर झडती घेतल्याचे समजते. मूळ सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील असलेल्या खरात याच्या शिक्षणापासून ते स्वयंघोषित कॅप्टन पदापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चा परिसरात सुरू आहे. सुमारे १७ ते १८ वर्षांपूर्वी मिरगाव शिवारात जागा घेऊन या ठिकाणी बांधण्यात आलेले ईशान्येश्वर मंदिर, मंदिर परिसराचा वाढलेला विस्तार आणि मंदिराच्या पाठीमागील बाजूला बांधलेला आलिशान दगडी चिरेबंदी बंगला, याच परिसरात वाढलेला शेतीचा विस्तार याबाबतच्या विविध चर्चाना उधाण आले होते. महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबाबतही तर्कवितर्क लढवले गेले. बंगल्यावर मजुरांचा राबता बुधवारी रात्रीनाशिकक्राईम ब्रँचच्यापोलिसांनीमिरगाव शिवारातील बंगल्यावर येऊन काही साहित्य ताब्यात घेतल्याचे समजते. या बंगल्यावर गुरुवारी दिवसभर कामाला असलेल्या मजुरांचा राबता दिसून आला. बंगल्यावर गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारल्याचेही दिसून आले. मिरगाव येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे होते. किरकोळ प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी वर्दळ सुरू होती.
महिला शोषण आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अशोक खरात यांना अटक
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.