ओटीटीवर सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. काही दमदार चित्रपटांच्या कथा, त्याचे सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत सिनेमा पाहायला भाग पाडतात. असाच एक दमदार क्राइम, सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा ६ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाचं तेव्हा प्रचंड कौतुक झालं होतं. या चित्रपटाचं नाव ‘राक्षसुडू’ (Rakshasudu) असं आहे. ‘राक्षसुडू’ हा ‘रत्सासन’चा अधिकृत रिमेक आहे. या सिनेमाच्या कथेत तेलुगू प्रेक्षकांसाठी काही बदल करण्यात आले होते. ‘राक्षसुडू’ चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार, या चित्रपटाचं आयएमडीबी रेटिंग याबद्दल जाणून घेऊयात. ‘राक्षसुडू’ चित्रपटाची कथा अरुण (बेल्लमकोंडा श्रीनिवास) नावाच्या एका तरुणाभोवती फिरते, ज्याला चित्रपट दिग्दर्शक बनायचे असते आणि तो सायको किलरच्या कथांवर संशोधन करत असतो. स्वप्न थ्रिलर चित्रपट बनवायचं असतं. पण वडिलांच्या निधनानंतर तो आपलं स्वप्न मागे सोडून पोलीस अधिकारी (PSI) होतो. नोकरीत रुजू झाल्यावर त्याच्यासमोर पहिलेच प्रकरण एका सिरियल किलरचे येते. शहरात शालेय मुलींचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणारा एक सिरियल किलर सक्रिय होतो. अरुण आपल्या फिल्म रिसर्चचा वापर करून त्या खुन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या चित्रपट निर्मितीच्या अनुभवाच्या आधारे खून करणाऱ्याची सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हा प्रवास अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारा आहे. या दरम्यान, त्याला अनेक आव्हानं येतात, या आव्हानांमध्येच सस्पेन्स दडलेला असतो. ‘राक्षसुडू’ या चित्रपटाचा बॅकग्राउंड स्कोअर व सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. त्याने या सिनेमाच्या सस्पेन्समध्ये भर पडते. दिग्दर्शक रमेश वर्मा यांनी ओरिजनल चित्रपटाच्या धर्तीवर तेलुगू प्रेक्षकांसाठी हा सिनेमा तयार केला. बेल्लमकोंडा साई श्रीनिवास पहिल्यांदाच या चित्रपटात गंभीर भूमिकेत झळकला. हा चित्रपट मूळ तेलुगू असला तरी, ‘Rakshasudu’ याच नावाने तो हिंदीत डब झालेला आहे. ‘राक्षसुडू’ या चित्रपटात साई श्रीनिवास मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील सर्वात दमदार भूमिका अर्थात ख्रिस्तोफर ही खलनायकाची अत्यंत प्रभावी भूमिका सरवणनने साकारली आहे. तसेच यात अनुपमा परमेश्वरन, राजीव कनकला, विनय राय व सुजन या कलाकारांनाही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. घिबरनच्या दमदार बॅकग्राउंड म्युझिकने चित्रपट आणखी प्रभावी केला आहे. या सिनेमाचं एडिटिंग अमर रेड्डीने केलं होतं. चित्रपटाची निर्मिती पेन मूव्हीजने केली होती. ‘राक्षसुडू’ हा चित्रपट २०१९ मध्ये आला होता. २ तास २ मिनिटांचा ‘राक्षसुडू’ हा तमिळमधील गाजलेला सिनेमा ‘रत्सासन’चा तेलुगू रिमेक आहे. या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांचाही याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयएमडीबीवर ‘राक्षसुडू’ला ७.९ रेटिंग मिळालं. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो ZEE5 वर पाहू शकता. जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल, तर नक्की पाहा. खासकरून जर तुम्हाला सिरियल किलर आणि मिस्ट्री जॉनर आवडत असतील, तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका.
राक्षसुडूः एक रोमांचक गुन्हेगारी कथा जी तुम्हाला काठावर ठेवते
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.