Achira News Logo
Achira News

रघु शर्माने आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले

Lokmat
रघु शर्माने आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले
Full News
Share:

आयपीएल २०२६स्पर्धेतील ४४ व्या सामन्यातमुंबई इंडियन्सकडूनलेगस्पिनर रघू शर्माला अखेर पदार्पणाची संधी मिळाली आहे. चेपॉकवरीलचेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्यासामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीवेळी मोठ्या बदलासह या खास डेब्यूची घोषणा केली. खास गोष्ट ही की, गोलंदाजीतील कमी भरून काढण्यासाठीमुंबई इंडियन्सच्यासंघाने युवा खेळाडूला नव्हे तर ३३ वर्षीय अनुभवी लेगस्पिनर रघू शर्मावर डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! कोण आहे रघू शर्मा? देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि पुदुचेरी प्रतिनिधित्व करणारा रघू शर्मा अनेक वर्षांपासून मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत होता. गत हंगामात दुखापतग्रस्त विघ्नेश पुथूरच्या जागी मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांत बदली खेळाडूच्या रुपात आपल्या संघात स्थान दिले. पण २०२५ च्या हंगामात त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. KL राहुलनं साधला मोठा डाव! किंग कोहलीला मागे टाकत एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा फिरकीपटू प्रमाणित स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर आणि प्रमाणित स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे. एवढेच नाही तर क्रिकेटरच्या रुपात अल्प संधी मिळत असताना क्रिकेटशी कनेक्ट राहण्यासाठी तो स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्समध्ये मास्टर्सही करत आहे. पुदुचेरी क्रिकेट असोसिशनमध्ये तो ट्रेनर-कम-प्लेअरच्या भूमिकेतही काम केले आहे.संघर्षमयी प्रवासानंतर IPL मध्ये छाप सोडण्याची मोठी संधी ३३ व्या वर्षी IPL पदार्पण करणं ही गोष्टच त्याच्या संघर्षाची खरी कहाणी आहे. रघू शर्माने आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामन्यांत ५७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १२ लिस्ट ए सामन्यांत १८ विकेट्स आणि IPLपूर्वीच्या चार टी-२० सामन्यांत चार विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत. टी-२० मधील अल्प अनुभावासह तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीतील कमी भरून ट्रम्प कार्ड ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. हा नवा प्रयोग तरी MI साठी फायद्याचा ठरणार का? चेन्नई विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने लेगस्पिनर रघू शर्माशिवाय कृष भगत याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. या वेगवान गोलंदाजाला अश्वनी कुमारच्या जागी संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत आमच्याकडे अधिक पर्याय नाहीत, ही गोष्ट हार्दिक पांड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर बोलून दाखवली होती. हा नवा प्रयोग तरी MI ला वाचवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रघु शर्माने आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले | Achira News