Achira News Logo
Achira News

'राजा शिवाजी'बॉक्स ऑफिसः छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास जिवंत करणारा ऐतिहासिक चित्रपट

Lokmat
'राजा शिवाजी'बॉक्स ऑफिसः छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास जिवंत करणारा ऐतिहासिक चित्रपट
Full News
Share:

Raja Shivaji Box Office:रितेश देशमुखचंदिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमातून छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. दोन दिवसांतचरितेश देशमुखच्या'राजा शिवाजी'ने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाचं दोन दिवसांचंबॉक्स ऑफिस कलेक्शनसमोर आलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल १२.४० कोटींचा गल्ला जमवला. या कमाईसह 'राजा शिवाजी' मराठी सिनेमातील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ओपनिंग डे ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही सिनेमाने घसघशीत कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला आहे. त्यामुळे दोनचं दिवसांत सिनेमाची कमाई २२.९५ कोटी इतकी झाली आहे. ‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटाविषयी सांगायचं तर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. विशेष म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून, त्यांच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प अधिक भव्य स्वरूपात साकारला गेला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'राजा शिवाजी'बॉक्स ऑफिसः छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास जिवंत करणारा ऐतिहासिक चित्रपट | Achira News