Achira News Logo
Achira News

'राजा शिवाजी'ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसादः रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट चमकतो

Maharashtra Times
'राजा शिवाजी'ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसादः रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट चमकतो
Full News
Share:

मुंबई -रितेश देशमुखच्या ' राजा शिवाजी ' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. बॉलिवूडकारांसोबतच मराठी कलाकारांनीही या सिनेमाचं भरघोस कौतुक केलंय. अशातच आता मराठी अभिनेता शशांक केतकरनंही सिनेमाचं कौतुक केलंय. त्याचबरोबर हा सिनेमा पाहण्यासाठी अभिनेत्याच्या लेक खास लूकमध्ये सिनेमा बघण्यासाठी गेला होता. त्यासंदर्भात शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय.राजा शिवाजी चित्रपटाचा पहिला शो लातूरकरांसोबत; रितेश-जेनेलिया यांची धमाकेदार एन्ट्रीशशांक केतकर पोस्टशशांक केतकर शेअर केलेल्याव्हिडिओमध्येम्हणतोय की, 'जय शिवराय! आम्ही आता ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा पाहायला जात आहोत. अर्थात, ठाण्यात आम्ही या चित्रपटाचा मराठी शो बघायला जातोय. माझा मुलगा ऋग्वेद, महाराजांच्या शौर्यगाथा ऐकून इतका प्रेरित झाला आहे की, सकाळी उठल्यावर ते अगदी रात्री झोपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्याला ऐकायच्या असतात. त्याला महाराजांच्या गड-किल्ल्यांबद्दल जाणून घ्यायचं असतं. त्याच्याकडे खेळणी सुद्धा सगळी अशीच आहेत. दिवसभर खेळण्यातली तलवार, ढाल घेऊन तो खेळत असतो.'Arbaj Shaikh : 'सैराट' फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; पत्नीसोबत फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमीअभिनेत्याच्या लेकाच्या लूकनं वेधलं लक्ष'आता त्याला जेव्हा समजलं की, आज आम्ही हासिनेमापाहायला जातोय, त्यावेळी त्याने मला एक विनंती केली. ही विनंती काय आहे तुम्हीच पाहा, हे बघा, आमचा बाळशिवाजी तयार आहे!' असं म्हणत शशांकनं ऋग्वेदचा लूक दाखवला आहे. अभिनेत्याच्या लेकानं सिनेमा बघायला जाण्यासाठी खास छत्रपती शिवाजी महाराजांचा लूक केलेला दिसतोय. या व्हिडिओमध्ये ऋग्वेद, 'जय भवानी, जय शिवाजी' असंही म्हणतोय. हा व्हिडिओ शेअर करत रितेशनं, 'आशा आहे की, रितेश सर तुमच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचेल…आमचे बाल शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज की जय!' असं कॅप्शन लिहिलं आहे.View this post on InstagramA post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)दरम्यान, 'राजा शिवाजी' या सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात अभिषेक बच्चन, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांच्याही भूमिका आहेत. सलमान खानचीही या चित्रपटात एक विशेष छोटी भूमिका असून रितेश आणि जिनिलियाचा मुलगा, राहिलनं, या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलंय.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'राजा शिवाजी'ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसादः रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट चमकतो | Achira News