नागरिकांनी सुचविलेल्या उपाययोजना राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे. शनिवार व रविवारची वाढती गर्दी लक्षात घेता तात्पुरती अथवा कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. मुख्य चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी. नो पार्किंग झोनची काटेकोर अंमलबजावणी करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी नियम का पाळावेत, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील वाढती गर्दी पार्किंगचा अभाव आणि पदपथांवरील अतिक्रमण यासाठी नेमकी जबाबदारी कोणाची हे प्रशासनाने स्पष्ट करावे.
राजमाता जीजाऊ उद्यान परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.