Achira News Logo
Achira News

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बलात्काराचा आरोपी ज्योतिषी ट्रस्ट

Lokmat
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बलात्काराचा आरोपी ज्योतिषी ट्रस्ट
Full News
Share:

पुणे :भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेत्या रूपाली पाटील -ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत रूपाली पाटील -ठोंबरे म्हणाल्या, हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, हा पूर्णपणे महिलांचा विषय आहे. एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फुटली होती. तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या ट्रस्टवर असल्यामुळे पोलिस कारवाई होत नव्हती का? ५८ व्हिडिओ सापडले आहेत, म्हणजे किमान ५८ महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. सर्व संबंधित ट्रस्टवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्णमहाराष्ट्रातआंदोलन करण्यात येईल. मी हा विषय सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, असे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बलात्काराचा आरोपी ज्योतिषी ट्रस्ट | Achira News