Achira News Logo
Achira News

राणी मुखर्जीच्या'मर्दानी 3'ने जोरदार सुरुवात करत तिकीटबारीवर विजय मिळवला

Maharashtra Times
राणी मुखर्जीच्या'मर्दानी 3'ने जोरदार सुरुवात करत तिकीटबारीवर विजय मिळवला
Full News
Share:

मुंबई -राणी मुखर्जीचा ' मर्दानी ३ ' हा सिनेमा ३० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात राणीनं पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. ' बॉर्डर २ ' ने निर्माण केलेल्या वादळाला तोंड देतही 'मर्दानी ३' आपली ताकद दाखवत आहे. सिनेमानं ओपनिंग वीकेंडला चांगली कमाई केली. जाणून घेऊया 'मर्दानी ३' ने पहिल्या सोमवारी किती कमाई केली.Tharala Tar Mag : बेलसाठी नागराजचे प्रयत्न, खुनशी वृत्तीच्या नागोबा विरोधात सुमन ठामपणे उभी; 'माझा नवरा नीच' म्हणत कोर्टाला दिली साक्षसोमवारी राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' थोडा मंदावला, पण या क्राइम थ्रिलर चित्रपटाच्या कमाईचे आकडे निराशाजनक नाहीत. चांगल्या सुरुवातीच्या आठवड्यानंतर, चित्रपटाला सोमवारचा सामना करावा लागला आणि त्याचेनिकालहीचांगले होते.'मर्दानी २' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाचित्रपटाच्याकलेक्शनबद्दल सांगायचं तर, 'मर्दानी ३' ने फ्रँचायझीमधील सर्वात मोठी ओपनिंग केली. पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली. शनिवारी, चित्रपटानं ५०% वाढ नोंदवली आणि ६ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी, राणी मुखर्जीच्या सिनेमानं पुन्हा एकदा काही वाढ दाखवली आणि ७.२५ कोटींची भर घातली, ज्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याचा ओपनिंग वीकेंड एकूण १७.२५ कोटींवर पोहोचला. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मर्दानी ३' ने सोमवारी, रिलीजच्या चौथ्या दिवशी २.१५ कोटींची कमाई केली. यांसह, 'मर्दानी ३' ची चार दिवसांची एकूण कमाई आता १९.६५ कोटी झाली आहे.Bigg Boss Marathi 6 : स्पर्धकांनी एकमेकांच्या पाठीत खुपसला खंजीर, फुटला अश्रूचा बांध; 'या' सदस्यांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार'मर्दानी'ची 'बॉर्डर २'ला टक्करअनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर २' हा चित्रपट २३ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं, पहिल्या आठवड्यातसिनेमानं२०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात सुरुवातीच्या काळात सिनेमाच्या कमाईला मोठा धक्का बसला. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'बॉर्डर २' ने रिलीजच्या ११ व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी ५.७५ कोटींची कमाई केली.जेलमध्ये असताना यायचे जीव देण्याचे विचार, क्रिकेटपटू अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ; म्हणाला, 'मी २७ दिवस...'हा चित्रपट राणी मुखर्जीच्या टॉप १० मध्ये सामील होईल का?'मर्दानी ३' हा चित्रपट राणी मुखर्जीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांमध्ये सामील होतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या,२९ कोटी कमावणारा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला 'नो वन किल्ड जेसिका' हा सिनेमा १० व्या क्रमांकावर आहे. सध्याचा ट्रेंड पाहता, हा चित्रपट दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी राणी मुखर्जीच्या कारकिर्दीतील टॉप १० चित्रपटांच्या यादीत येऊ शकतो. दरम्यान, 'मर्दानी' चं दिग्दर्शन ज्येष्ठ चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांनी केलं होतं, तर 'मर्दानी २' चे दिग्दर्शन गोपी पुथरण यांनी केलेलं. तर 'मर्दानी ३' चे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

राणी मुखर्जीच्या'मर्दानी 3'ने जोरदार सुरुवात करत तिकीटबारीवर विजय मिळवला | Achira News