Achira News Logo
Achira News

रणपती शिवरायः एक ऐतिहासिक नाटक शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेचा उलगडा करते

Lokmat
रणपती शिवरायः एक ऐतिहासिक नाटक शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेचा उलगडा करते
Full News
Share:

शिवराजअष्टकमधील सहावं पुष्प 'रणपति शिवराय -स्वारी आग्रा' हा सिनेमा ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्याधाडसी आग्रा स्वारीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमातून प्रेक्षकांना शिवरायांच्या शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय पाहायला मिळणार आहे.दिग्पाल लांजेकरदिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात बॉर्डर फेम अभिनेत्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूड अभिनेता पुनीत इस्सर या मराठी सिनेमात दिसणार आहेत. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेले पुनती इस्सर 'रणपति शिवराय' सिनेमात महत्त्वाची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे. महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या भूमिकेतून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसतील. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार आहे. या सिनेमात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रछत्रपती शिवाजी महाराजांच्याभूमिकेत आहे. तर औरंगजेबाची भूमिका समीर धर्माधिकारी साकारताना दिसणार आहे. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, ऋषी सक्सेना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रणपती शिवरायः एक ऐतिहासिक नाटक शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेचा उलगडा करते | Achira News