मुंबई: मागील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेला धुरंधर सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट ठरला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या जवळपास कमाई केली होती. आता तीन महिन्यातच या सिनेमाचा सिक्वल येत आहे. १९ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यामुळं सिनेमातील कलाकारांच्या मानधनाबद्दलही बोललं जात आहे.दिग्दर्शक आदित्य धरच्या बहुप्रतिक्षित ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' मध्ये पहिल्या भागातील कलाकार तर असणाच आहेत, पण काही नवीन चेहरेही दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगमध्येही विक्रम प्रस्थापित केले आहेत. २७५ कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेल्या या मल्टीस्टारर चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या भूमिकांसाठी तगडं मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे.या चित्रपटातरणवीर सिंहपुन्हा एकदा 'हमजा' आणि 'जसकीरत सिंह रंगी' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपटाचा मुख्य नायक आहे. रणवीरनं 'धुरंधर २' साठी सर्वाधिक मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय. रिपोर्ट्सनुसार, त्यानं या भूमिकेसाठी ३० कोटींच्यावर मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.तर बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्त या चित्रपटात 'चौधरी असलम' या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याला या चित्रपटासाठी जवळपास १० कोटी रुपये मानधन मिळालं असल्याची चर्चा आहे.'मुली म्हणजे डोक्यावरचं ओझं', नातेवाईकांच्या टोमण्यांना Mohan Sisters चे सडेतोड उत्तर, आईवडिलांना भेट दिलं पेंटहाऊसआर. माधवनराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भूमिकेतून आर. माधवन आहे. त्यानं 'अजय सन्याल' या पात्रासाठी ९ कोटी रुपये फी घेतल्याचं म्हटलं जात आहे.रणवीर सिंगची बॉसी एंट्री, अन् चाहत्यांनी केलं असं काही...अक्षय खन्नापहिल्या भागात 'रेहमान डकैतम्हणून गाजलेला अक्षय खन्ना पुन्हा दुसऱ्या भागात दिसणार की नाही, याबद्दल उत्सुकता आहे. खरं तर फ्लॅश बॅक कथानाकात तो दिसणार आहे. त्यामुळं या भागासाठी अंदाजे २.५ ते ३ कोटी रुपये मानधन मिळाल्याचं समजतं.Raqesh Bapat : 'अपेक्षा वाढतात तेव्हा नातं बदलतं, म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला' राकेश बापटच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली बहीणसर्वात कमी मानधनतसंच या चित्रपटात क्रूर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालला सर्वात कमी मानधन मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यानं 'इलियास काश्मिरी'च्या भूमिकेसाठी १ कोटी रुपये फी घेतल्याचं म्हटलं जातं.सारा अर्जुनचित्रपटाची नायिका सारा अर्जुन हिनं 'यलिना' या भूमिकेसाठी १ कोटी रुपये मानधन घेतल्याची आहे. कमी वयात मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळं तिच्यासाठी हे मानधम मोठं असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, कलाकारांच्या मानधनाचे हे आकडे अधिकृत नसले तरी, मानधानाच्या खऱ्या आकड्यांच्या जवळपास जाणारे आहेत.
रणवीर सिंगचा'धुरंधर 2: द रिव्हेंज'हा चित्रपट संजय दत्त आणि इतर कलाकारांसह 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.