Achira News Logo
Achira News

रणवीर सिंगच्या'धुरंधर 2'ने भारतीय तिकीटबारीवर खळबळ माजवली

Maharashtra Times
रणवीर सिंगच्या'धुरंधर 2'ने भारतीय तिकीटबारीवर खळबळ माजवली
Full News
Share:

डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील बरेच रेकॉर्ड मोडले. हा सिनेमा पाहिल्यापासून अनेकजण या सिनेमाचा दुसरा भाग कधी येईल याकडे डोळे लावून बसले होते. अखेर 18 मार्च रोजी या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज झाला.'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट 'पेड प्रिव्ह्यू' शोजसह चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पुन्हा एकदा प्रेक्षकांना ॲक्शन, ड्रामा आणि निखळ मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी देत आहे. विशेष म्हणजे,Dhurandhar 2केवळ आपल्या 'प्रिव्ह्यू शोज'द्वारेच मोठी खळबळ उडवून दिली आहे, ही खळबळ सिनेमाच्या पहिल्या पार्टवेळी सुद्धा निर्माण झाली नव्हती. धुरंधर 2 ने त्याच्या प्रिव्हयू शोमधून किती कमावले जाणून घेऊ.कोणी गिरगाव शोभायात्रा तर कोणी गावाकडची जत्रा, झी मराठीच्या नायिकांनी सांगितले Gudhi Padwa 2026 चे प्लॅन, जेवणाचा बेतही न्याराबरेच चढउतार, प्रदर्शनातील फेरबदल आणि काही कट्सनंतर अखेर बुधवारी संध्याकाळी संपूर्ण भारतात 'धुरंधर: द रिव्हेंज'चे 'पेड प्रिव्ह्यू' शोज सुरू झाले. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने आपल्या प्रीमियर शोजपासूनच बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला. या चित्रपटाने भारतीय चित्रपटाच्या 'पेड प्रिव्ह्यू' शोजचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत; बॉलिवूडचे जुने रेकॉर्डस् तब्बल 340% च्या मोठ्या फरकाने मागे आहेत. चित्रपटाबद्दल असलेल्या प्रचंड उत्सुकतेमुळे आणि चर्चेमुळे, 'धुरंधर 2' ला इतर भारतीय चित्रपटापेक्षा आजवरची सर्वात मोठी 'पेड प्रिव्ह्यू स्क्रीनिंग' स्केल देण्यात आली; केवळ भारतातच 6000 स्क्रीन्सवर या चित्रपटाचे 9000 शोज रिलीज करण्यात आले.इतक्या मोठ्या प्रमाणावरील रिलीज तसेच तिकिटांचे तब्बल 400 रुपयांसारखे मोठे दर असूनही, चित्रपटाची मागणी प्रचंड होती आणि त्याचे शोज अनेक दिवस आधीच पूर्णपणे बुक झाले होते. म्हणजेच 'हाऊसफुल' झाले होते.चित्रपटाच्या प्रीमियर शोजच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास:'Sacnilk' कडील आकडेवारीनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने 18 मार्च 2026 रोजी रिलीज झालेल्या आपल्या 'पेड प्रिव्ह्यू' शोजमधून भारतात 44 कोटींची निव्वळ कमाई (Net Collection) केली आहे. यावरुन दिसून येते की या सिनेमाने 025 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या भागाला मागे टाकले आहे. धुरंधरने रिलीजच्या पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई नोंदवली होती.Tharala Tar Mag : सायली अर्जुनच्या हाती लागला प्रियाचा Ex बॉयफ्रेंड, डाव फसल्यावर स्वत:ला वाचवायला प्रियाने सदा मैनाला केलं गुल!शिवाय, या चित्रपटाने 52.71 कोटींची एकूण कमाई नोंदवली आहे. धुरंधर 2 ने प्रीमियर कमाईचा मागील इतर सर्व सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे.भारतातील 'पेड प्रिव्ह्यूज'मधून या चित्रपटाने कमावलेले 44 कोटींचे निव्वळ उत्पन्न, हे स्त्री 2 ने 2024 मध्ये केलेल्या बॉलिवूड रेकॉर्डपेक्षा (10 कोटी) तिप्पटीपेक्षाही अधिक आहे. या यशासह, 'पॅन-इंडिया' रेकॉर्डही मोडीत काढला गेला असून, पवन कल्याणच्या OG (25 कोटी) या चित्रपटाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले आहे. त्यामुळे सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.धुरंधर 2 बद्दल माहितीरणवीर सिंग व्यतिरिक्त या सिनेमामध्ये आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकार आपापल्या भूमिका पुन्हा साकारताना दिसतील. हा 'स्पाय थ्रिलर' चित्रपट 19 मार्च रोजी जगभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाची जागतिक स्तरावर एकूण कमाई 1300 कोटी इतकी झाली होती; आणि डिसेंबरमध्ये प्रदर्शित होऊन तीन महिने उलटले असले तरीही, हा चित्रपट अद्यापही काही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रणवीर सिंगच्या'धुरंधर 2'ने भारतीय तिकीटबारीवर खळबळ माजवली | Achira News