दिग्दर्शक आदित्य धरचा धुरंधर हा सिनेमा गाजल्यानंतर 19 मार्च रोजी या सिनेमाचा दुसरा पार्टही रिलीज झाला. प्रचंड रक्तपात, तीव्र हिंसाचार आणि कथानकातील अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेला हा चित्रपट जवळपास 3 तास 45 मिनिटं प्रेक्षकांना त्यांच्या खुर्च्यांना खिळवून ठेवण्यास भाग पाडतो.'पेड प्रिव्ह्यूज'मधून मिळालेल्या कमाईमुळे, हा चित्रपट आपल्या अधिकृत रिलीज डेटच्या पूर्वीच जबरदस्त कामगिरी बजावून सर्वश्रेष्ठ बनला होता. आता सर्वांचे लक्ष बॉक्स ऑफिसच्या पहिल्या दिवसाकडे होते.हा चित्रपट, आता चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवा अध्याय रचण्यास सज्ज झाला आहे. रणवीर सिंगचा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट 3 तास 43 मिनिटे या एकूण कालावधीत असा एकही प्रसंग किंवा दृश्य नाही ज्याबद्दल असे म्हणता येईल की त्याची चित्रपटात आवश्यकता नव्हती. या चित्रपटाने रिलीजटच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी, किती कमाई केली ते जाणून घेऊ.मातृमुखी की पितृमुखी? Bharti Singh ने 3 महिन्यांनी दाखवला दुसरा लेक काजूचा चेहरा'धुरंधर 2' च्या कमाईत 138.5% ची प्रचंड वाढ'Sacnilk' च्या अहवालानुसार, धरुंदरचे 12,292 'पेड प्रिव्ह्यू' शो आयोजित करण्यात आले होते, तर रिलीजच्या पहिल्या दिवशी शोची संख्या 21,728 इतकी होती. या चित्रपटाच्या कमाईत इतकी प्रचंड वाढ दिसून आली की, त्याच्याएकूण कलेक्शनमध्येतब्बल 138.5% ची वाढ नोंदवली गेली. गुरुवारी या चित्रपटाने 102.55 कोटींचे Net Collection केले. एकत्रितपणे पाहता, दोन दिवसांच्या कालावधीत चित्रपटाचे अंदाजे 145.55 कोटींपर्यंत गल्ला जमवला आहे. त्यात'पेड प्रिव्ह्यू'च्या कमाईचाही समावेश चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस एकूण 172.63 कोटींची कमाई केली आहे.Lagnanantar Hoilch Prem : काव्या पार्थला वेगळं करण्याच्या मनसुब्याने रम्या फेक डेटवर! नंदिनीला वाटतोय बहिणीचाच हेवा'धुरंधर 2' ची जगभरातील कमाई किती आहे?'धुरंधर 2' च्या जगभरातील कमाईबाबतच्या वृत्तांनुसार, या चित्रपटाने परदेशी मार्केटमध्ये अंदाजे 64 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे, जगभरातील एकूण कमाई जवळपास 236 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.या चित्रपटाने 'जवान' आणि 'पठाण' सारख्या चित्रपटांना त्यांच्या प्रदर्शनाच्या अगदी पहिल्याच दिवशी मागे टाकले आहे.जरी 'धुरंधर 2' हा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या म्हणजेच 'बाहुबली ' (121.00 कोटी), 'RRR' (133 कोटी) आणि 'KGF: Chapter 2' (116कोटी) पेक्षा काहीसा मागे असला, तरीही त्याने 'जवान' (75 कोटी) आणि 'पठाण' (57 कोटी) यांसह इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत आघाडी घेतली आहे.
रणवीर सिंगच्या'धुरंधरः द रिव्हेंज'ने चित्रपटसृष्टीत नवा अध्याय रचला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.