Achira News Logo
Achira News

रत्नागिरी पंचायत समिती निवडणूकः शिक्षणमंत्र्यांनी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली

Lokmat
रत्नागिरी पंचायत समिती निवडणूकः शिक्षणमंत्र्यांनी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली
Full News
Share:

रत्नागिरी:रत्नागिरीपंचायत समितीसाठीउद्याेगमंत्री तथा पालकमंत्रीउदय सामंतयांनी शिंदेसेनेची दुसरी ११ जणांची यादी रविवारी जाहीर केली. निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देत एकूण १६ उमेदवार जाहीर केले आहेत.मंत्रीउदय सामंतयांनी शनिवारीपंचायत समितीसाठीपाचजणांची नावे जाहीर केली हाेती. यामध्ये विद्या विलास बोंबले (हातखंबा), नेहा प्रवीण गावणकर (देऊड), सुमेश सुरेश आंबेकर (केळ्ये), डॉ. पद्मजा संजय कांबळे (नाणीज), परेश रामकृष्ण सावंत (साखरतर) यांचा समावेश हाेता. त्यानंतर रविवारी अन्य ११ जणांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत.शिंदेसेनेने पंचायत समितीच्या माजी सभापती अनुष्का अभय खेडेकर यांना वाटद गणातून उमेदवारी दिली आहे. मागील कालावधीत त्यांचे पती अभय खेडेकर हे पंचायत समिती सदस्य होते. अनुष्का खेडेकर यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर अन्य १५ उमेदवार हे नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिंदेसेनेचे दुसऱ्या यादीतील उमेदवारवाटद : अनुष्का अभय खेडेकर, करबुडे : प्रवीण धोंडू पांचाळ, नेवरे : पूर्वा सचिन दुर्गवळी, कोतवडे : स्वप्नील सदानंद मयेकर, झाडगाव (म्युन्सिपल बाहेर) : साक्षी परेश कुमठेकर, खेडशी : वैभव विठोबा पाटील, नाचणे : सचिन सुधाकर सुपल, कर्ला : कांचन कृष्णकांत नागवेकर, गोळप : अर्चना तुषार साळवी, पावस : नामदेव नारायण कोकरे, गावखडी : स्वाती संदेश शिंदे. आई-वडिलांनंतर मुलगा रिंगणातखेडशी पंचायत समिती गणातून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैभव पाटील यांचे वडील विठोबा पाटील हे यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री वैभवी पाटील यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले हाेते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रत्नागिरी पंचायत समिती निवडणूकः शिक्षणमंत्र्यांनी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली | Achira News