Achira News Logo
Achira News

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून'राजा शिवाजी'प्रदर्शित केला

Maharashtra Times
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून'राजा शिवाजी'प्रदर्शित केला
Full News
Share:

गुढीपाडव्याच्या मंगलमय सणात नव्या स्वप्नांची गुढी उंचावत, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी तमाम सिनेरसिकांसाठी खास भेट आणली आहे. लवकरच त्यांचा आगामी 'राजा शिवाजी' हा प्रदर्शित होणार आहे. या भव्य सिनेमातून ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना अर्पण करत आहेत; अशी भावना त्यांनी 'मुंटा'कडे व्यक्त केली.'राजा शिवाजी' या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाच्या प्रक्रियेबाबत रितेश म्हणाला, 'आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर भव्य सिनेमा व्हावा, ही माझी आणि जिनिलिया यांची १० वर्षांपूर्वीपासूनची इच्छा होती. काही कारणांनी ते होऊ शकलं नाही. २०१६मध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत हा प्रवास सुरू झाला, नंतर नागराज मंजुळे यांच मार्गदर्शनही लाभलं, पण करोनामुळे थांबावं लागलं. 'वेड' नंतर मी स्वतः 'राजा शिवाजी' दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. खरं तर, सुरुवातीला दिग्दर्शनाचा विचार मनात नव्हता. आमची 'मुंबई फिल्म कंपनी' हा सिनेमा निर्मिती करेल एवढंच ठरलेलं. पण महाराज केवळ महाराष्ट्रापुरते नाहीत, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे मराठीतील हा 'पॅन इंडिया' सिनेमा निर्मित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराजांना आमची ही मानवंदना आहे.'Ankita walavalkar Post: 'आज माझ्या Antilia मध्ये उभी आहे', अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांचं स्वप्न झालं पूर्ण, काय आहे कोकण हार्टेड गर्लची पोस्टजिनिलियासुद्धा रितेशच्या बरोबरीनं उभं राहत सिनेमाचं काम बघतेय. त्याबद्दल ती म्हणाली, 'माझ्यासाठी 'राजा शिवाजी' हा केवळ एक सिनेमा नाही, तर एक भावनिक प्रवास आहे. हा सिनेमा फक्त मराठी प्रेक्षकांपुरता मर्यादित राहू नये, तर संपूर्ण देशानं अनुभवायला हवा. त्यामुळेच आम्ही हा सिनेमा सर्वसमावेशक करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक विभागात विविधता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिलं. जिथे मराठी व्यक्तिमत्त्वं आहेत; तिथे मराठी कलाकार, पण इतर भूमिकांसाठी देशभरातील सक्षम कलाकारांना विचारणा केली. भव्य, उच्च दर्जाचा आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा मराठी सिनेमा उभा करणं हा आमचा एकमेव उद्देश होता.महेश मांजरेकर,सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री पटवर्धन आदी सर्व कलाकार आमच्या पाठीशी उभे राहिले. निर्मितीत ज्योती देशपांडे, निखिल साने यांनी पुढाकार घेतला. अजय-अतुल यांचं संगीत नसतं, तरछत्रपती शिवाजी महाराजांवर असा चित्रपट आम्हाला उभा करता आला नसता.'रितेश आणि जिनिलिया देशमुख करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी लीननूतन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! नव्या स्वप्नांची ही सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि यशाची नवी पहाट घेऊन येवो. कुटुंबीय व मित्रांच्या आशीर्वादानं प्रत्येक अडचण दूर सारत, नव्या उमेदीनं पुढे जात राहा. तुमचा प्रत्येक दिवस अधिक सुंदर होत जावो !रितेश देशमुख, अभिनेता-दिग्दर्शकभविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांची आधीच लागायची चाहूल, लहान असताना भूत दिसायची असा Tanushree Dutta चा दावासण म्हणजे केवळ उत्सव नाही, तर कुटुंबासोबत घालवलेले क्षण जपण्याची सुंदर संधी आहे. हसण्यात, गप्पांमध्ये आणि एकत्र साजऱ्या केलेल्या परंपरांमध्येच आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी निर्माण होतात. त्या आठवणीच खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य समृद्ध करतात.- जिनिलिया देशमुख, अभिनेत्री निर्माती

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून'राजा शिवाजी'प्रदर्शित केला | Achira News