Achira News Logo
Achira News

रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

Maharashtra Times
रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला
Full News
Share:

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चर्चा केवळ त्याच्या भव्यतंमुळंच नाही, तर 'देशमुख' कुटुंबाच्या खास सहभागामुळंही होत आहे.रितेश देशमुख (छत्रपती शिवाजी महाराज)या चित्रपटात रितेश देशमुखने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनयासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखनही रितेशनंच केलं आहे. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळाली आहे, तर नेटकऱ्यांमध्ये मात्र दोन गट पडले आहेत.'राजा शिवाजी' चित्रपटात देशमुख कुटुंब पडद्यावर!रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटानं मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात रितेशसोबत त्याची पत्नी, दोन्ही मुले आणि भाऊदेखील झळकले आहेत.जिनिलिया देशमुख (महाराणी सईबाई)रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख हिनं चित्रपटात महाराणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मितीही तिच्या 'मुंबई फिल्म कंपनी'नं केली आहे. रितेश आणि जिनिलिया यापूर्वी वेड सिनेमात एकत्र दिसले होते. रितेशनं राजा शिवाजी सिनेमाची घोषणा केली तेव्हाच, सईबाईंची भूमिका कोण साकारणार, याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर निर्माती जिनिलिया हिनंच ही महत्त्वाची भूमिका साकारली.रियान देशमुख (छत्रपती शिवाजी महाराज - बालपण/तरुणपण)रितेशचा मोठा मुलगा रियान हा देखील या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका विशेष कालखंडातील भूमिकेत दिसत आहे. अशाप्रकारे दोन्ही मुलांनी शिवरायांच्या आयुष्यातील विविध टप्पे पडद्यावर जिवंत केले आहेत.राहील देशमुख (बाल शिवाजी)रितेशचा धाकटा मुलगा राहील यानं चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केलं आहे. त्यानं चित्रपटात 'बाल शिवाजी' यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली असून, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.धीरज देशमुखरितेशचे धाकटे बंधू आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनीही या चित्रपटात एक महत्त्वाची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. 'छत्रपती' या गाण्यात त्यांची खास झलक पाहायला मिळाली आहे. राजकारणातून थेट अभिनयाच्या मैदानात उतरलेल्या धीरज यांच्या कामाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.रितेशच्या मित्रमंडळींच्याही विशेष भूमिकादेशमुख कुटुंबाव्यतिरिक्त या चित्रपटात रितेशचे मित्र असलेले बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आहेतसंजय दत्त: अफजल खानअभिषेक बच्चन: संभाजी शहाजी भोसलेविद्या बालन: खदिजा सुलतानाभाग्यश्री: राज माता जिजाऊसलमान खान: जीवा महाला (विशेष भूमिका)कुटुंबियांसोबत मिंत्र मंडळींच्या मुलांचंही स्वप्न केलं पूर्णतर या सिनेमात रितेशनं त्याच्या कुटुंबियांसोबतच त्याच्या जवळच्या मित्रमंडळींच्या मुलांनाही आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं, मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी दिली आहे. संगीतकार अजय अतुल यांच्या कुटुंबातल्या आर्य ला देखील त्यांनी या सिनेमात झळकण्याची संधी दिली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला | Achira News