Achira News Logo
Achira News

रितेश देशमुख'मराठा राजा शिवाजी'चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठित भूमिका साकारणार

Maharashtra Times
रितेश देशमुख'मराठा राजा शिवाजी'चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठित भूमिका साकारणार
Full News
Share:

सध्या नुकताच रिलीज झालेला धुरंदर 2 हा सिनेमा गाजत असला तरीही यादरम्यान मराठमोळ्या राजा शिवाजी या सिनेमाची ही जोरदार चर्चा आहे. अभिनेता रितेश देशमुख या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर समोर आलाय. तो पहिल्यापासून प्रेक्षकांच्या मनात या सिनेमासाठीची उत्सुकता भरपूर वाढली आहे. या सिनेमांमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाह वरील मालिकेतला मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनराव याने सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.अभिनेता कपिल होनराव त्याच्यासाठी रितेश देशमुख सोबत काम करणं ही एक प्रकारे स्वप्नपूर्ती आहे. आपल्यासोशल मीडियावरतो याबद्दल बरेचदा व्यक्त होत असतो. एकदा तरी रितेश देशमुख ला भेटायचं असं स्वप्न उरी बाळगणाऱ्या कपिलला थेट त्याच्यासोबत राजा शिवाजी या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्याच्यासाठी एक प्रकारे आकाश ठेंगणे झाले होते.Lagnanantar Hoilch Prem : काव्या पार्थला वेगळं करण्याच्या मनसुब्याने रम्या फेक डेटवर! नंदिनीला वाटतोय बहिणीचाच हेवाअशातच गुढीपाडव्याच्या शुभ दिनी त्याच्या आयुष्यात आणखी एक खास गोष्ट घडली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करून आनंद व्यक्त केला. काल गुढीपाडव्याच्या दिवशी कपिलला अभिनेतारितेश देशमुखने स्वतःहून समोरून फोन केला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात नावात नव्हता. त्याने दोन स्क्रीन शॉट पोस्ट केले आहेत. त्यातल्या एका मध्ये लिहिले की यापेक्षा बेस्ट गुढीपाडवा होऊ शकतो का? जेव्हा सुपरस्टार दिग्दर्शक तुम्हाला स्वतः फोन करतात... रितेश देशमुख सरांचा स्वतःहून फोन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजी सिनेमाचा मी एक भाग आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. राजा शिवाजी हा सिनेमा येत्या 1 मे रोजी रिलीज होत आहे.दुसरी एक स्टोरी शेअर करा त्याने लिहिले की मी जवळपास एक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं पण कधीच त्यांचा नंबर मागितला नाही. आपलं काम प्रामाणिक करायचा आणि घरी जायचं आहेच मी इमानदारीने करत आलो. खूप वेळा वाटलं की त्यांचा नंबर मागूया पण कधीच हिम्मत झाली नाही. मग स्वतःला सांगितलं ठीक आहे आपलं काम करत राहायचं आणि आज स्वतः रितेश देशमुख सरांचा फोन आला ते खरंच सुपरस्टार आहेत....मातृमुखी की पितृमुखी? Bharti Singh ने 3 महिन्यांनी दाखवला दुसरा लेक काजूचा चेहराअभिनेता कपिल होनराव हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याच्या स्वप्नातलं घरही घेतलं आहे. त्याने बऱ्याच मालिकांमध्ये सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या. आता तो रितेश देशमुख सह राजा शिवाजी या सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज आहे. राजा शिवाजी सिनेमा बद्दल बोलायचे झाल्यास टीझर मध्ये रितेश देशमुख सह जेनेलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जितेंद्र जोशी, भाग्यश्री पटवर्धन यांसारख्या तगड्या कलाकारांची झलक दिसत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रितेश देशमुख'मराठा राजा शिवाजी'चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठित भूमिका साकारणार | Achira News