TATA Trust News:टाटा समूहाची होल्डिंग कंपनी - टाटा सन्स - च्या संचालक मंडळात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. टाटा ट्रस्ट्समधील वाद वाढतच चालला आहे. मेहली मिस्त्री आणि जे.एन. मिस्त्री यांनी आता वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांना टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट किंवा TEDT मध्ये पुन्हा नियुक्त करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान (विटो) केले आहे.श्रीनिवासन आणि सिंग यांचा सध्याचा कार्यकाळ पुढील रविवारी संपणार असून ट्रस्टच्या नियमांनुसार, कोणत्याही विश्वस्ताचा कार्यकाळ वाढवण्यासाठी ‘सर्वानुमते संमती’ अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, दोन विश्वस्तांनी विरोधात मतदान केल्यामुळे वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांचे पुन्हा विश्वस्त होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य दिसतआहे.Rupee Fall: तयार व्हा... महागाईचा बॉम्ब फुटणार; रुपयावरील संकट गहिरे, 95.40 चे ऐतिहासिक नीचांकी लोळण; मासिक बजेट बिघडणारटाटा ट्रस्टमधील विवाद थांबता थांबेनाTEDT टाटा सन्समध्ये थेट भागधारक नसले तरी टाटा नेटवर्कमधीलसर्वात प्रभावशाली ट्रस्टपैकीएक आहे. 5000 कोटी रुपयांहून अधिक देणगी निधीसह TEDT ट्रस्ट देशभरात शिक्षण आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमांचे व्यवस्थापन करतो. वेणू श्रीनिवासन सध्या टाटा ट्रस्ट्सचे उपाध्यक्ष असून TEDT चे विश्वस्त राहिले नाही, तर त्यांच्या त्या पदावरील कार्यकाळावर गंभीर प्रश्न निर्माण होतील. नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, विजय सिंग, मेहली मिस्त्री, जे.एन. मिस्त्री आणि इतर सध्या या ट्रस्टच्या विद्यमान विश्वस्तांपैकी आहेत.Indian Economy: सातासमुद्रापारहून भारताला इशारा... अर्थव्यवस्थेवर भयानक विळखा; फक्त GDP घसरणार नाही तर तिहेरी संकटटाटा ट्रस्ट्सची 8 मे रोजी बैठक8 मे रोजी टाटा ट्रस्ट्सची एक महत्त्वपूर्ण बैठक नियोजित असताना ही घडामोड समोर आली आहे. या बैठकीत टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील ट्रस्ट्सच्या प्रतिनिधित्वाचा आढावा घेतील त्यामळे, आता सर्वांचे लक्ष नोएल टाटा या दुसऱ्या लाईफ-टाइम विश्वस्तावर असेल ज्यांनी अद्याप या विषयावर आपले मत व्यक्त केलेले नाही. सर्वच विश्वस्त या प्रस्तावाला पाठिंबा देणार नाहीत असे संकेत मिळाले असल्यामुळे TEDT मधील पुनर्नियुक्ती प्रक्रिया आधीच अनिश्चित होती.BJP Win Bengal: 'इथेच जन्म, इथेच जगलो अन् इथेच मरणार,' बंगालमध्ये भाजपच्या विजयावर उद्योजक संजीव गोएंका भावूकटाटा सन्समध्ये भास्कर भट्ट एन्ट्री करणार?त्याचवेळी, हा मतभेद केवळ एका ट्रस्टपुरता मर्यादित नसून टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील ट्रस्ट प्रतिनिधींच्या संख्येत संभाव्य बदलाचे संकेत देत आहे. भास्कर भट यांना संचालक मंडळात समाविष्ट केले जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रुपयाच्या संकटात टाटा समूहाच्या संचालक मंडळाचा वाद वाढला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.