देशभरातील तापमान सध्या कमालीचं वाढलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी तर घरातून बाहेर पडू नये अशी स्थिती आहे. अंगाची नुसती लाहीलाही होतेय.अशा स्थितीत घरामध्ये जर फ्रीज नसेल तर समस्या आणखी वाढतात. थंडगार पाण्यामुळे तात्पुरतं का होईना, थोडं गार वाटतं. पण जर फ्रीज नसेल तर थंड पाणी कुठून आणायचं? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आहे.जर तुमच्याकडे फ्रीज नसेल, तर काळजी करू नका. घरामध्ये जे मातीचं मडकं असतं, त्यामध्येच तुम्ही फ्रीजसारखं थंडगार पाणी मिळवू शकता. पण कसं? चला जाणून घेऊया हा युनिक हॅक.पाणी कसं थंड करायचं?हा सोपा हॅक तुम्ही santuchoudhary_04 या इन्स्टाग्राम पेजवर पाहू शकता. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक मातीचं मडकं घ्या. या मडक्याभोवती काथ्याची दोरी गुंडाळा. (नारळाच्या सालीपासून बनवलेली दोरी)मग मडक्यामध्ये पाणी भरा आणि थोडं पाणी मडक्याभोवती बांधलेल्या दोरीवर टाका. या ओल्या दोरीमुळे बाहेरची उष्णता मडक्यावर थेट पडत नाही. परिणामी पाणी थंडगार राहतं.बरं, हा हॅक फारच सोपा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी थंड करण्यासाठी वीजेची गरजही लागत नाही. त्यामुळे लाईट बिलचे पैसेही वाचतात आणि फ्रीजच्या मेंटेनन्सची झंझटही संपते.(फोटो सौजन्य - santuchoudhary_04/Instagram)हा व्हिडिओ होतोय व्हायरलView this post on InstagramA post shared by Santu Choudhary (@santuchoudhary_04)हा व्हिडिओ ५० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, आता फ्रीजचे पैसे वाचले, तर कोणी म्हणतंय, हा हॅक भारताच्या बाहेर जाऊ देऊ नका.असो, तुम्हाला हा आपला देसी जुगाड हॅक कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
रेफ्रिजरेटरशिवाय थंड रहाः थंड पाण्यासाठी अद्वितीय हॅक
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.