बुलोवायो : भारताने पाकिस्तानची जगासमोर चांगलीच जिरवली. कारण भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत आता थेट सेमी फायनलमध्ये एंट्री केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने २५२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला हे आव्हान ३३.३ षटकांत पूर्ण करायचे होते, तरच ते सेमी फायनसलाठी पात्र ठरले असते. पाकिस्तानने ३३.३ षटकांत २५३ धावा करताआल्या नाहीत आणि भारताने दिमाखात वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये एंट्री केली आहे.भारताला वैभव सूर्यवंशीने या सामन्यात झोकात सुरुवात करून दिली होती. पण वैभवला या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही, वैभवने या सामन्यात २२ चेंडूंचा सामना केला. या २२ चेंडूंत त्याने ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या. वैभव बाद झाला तरी वेदांत त्रिवेदीने यावेळी भारतीय संघाचा डाव चांगलाच सावरला. वेदांतने सुरुवातीला संयतपणे फलंदाजी केली आणि पाकिस्तानला विकेट्स मिळवण्यापासून दूर केले. त्यानंतर मात्र वेदांतने दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेदांतने या सामन्यात २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६८ धावांची दिमाखदार खेळी साकारली. वेदांतच्या या खेळीचा भारताला चांगलाच आधार मिळाला. अखेरच्या षटकांत कनिक चौहानने २९ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३५ धावा केल्या, त्यामुळेच भारताला या सामन्यात अडीचशे धावांची वेस ओलांडता आली. भारताने या सामन्यात २५२ धावा करत दमदार आव्हान उभे केले होते.पाकिस्तानचा संघ भारताच्या २५३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हे आव्हान ३३.३ षटकांत पूर्ण करायचे होते. भारताने चौथ्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का दिला आणि त्यांची १ बाद २३ अशी अवस्था केली. त्यानंतर भारताने सेट झालेल्या पाकिस्तानच्या हमझा झहूरला ४२ धावांवर बाद केले. पण पाकिस्तानच्या उस्मान खानने यावेळी अर्धशतक झळकावले होते. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे पाकिस्तानला ३३.३ षटकांत २५३ धावा करता आल्या नाहीत आणि त्यामुळे आता सामन्याचा निकाल काहीही लागला तरीही भारत सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहे.IND vs PAKभारताने टिच्चून गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला निर्धारीत षटकांत आपले आव्हान पूर्ण करू दिले नाही, त्यामुळे भारताचा संघ आता सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.
रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आयसीसी क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.