Achira News Logo
Achira News

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान

Lokmat
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान
Full News
Share:

रशियाआणि युक्रेनमधीलयुद्धथांबवण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत. मात्र असे असले तरी, उभय देशांतील तणाव कमी होण्याचे नाव नाही.रशियानेमंगळवारी युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. ७० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ४५० ड्रोन्सच्या सहाय्याने हे जोरदार हल्ले करण्यात आले. असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. यासंदर्भात झेलेन्स्की यांनी 'एक्स' पोस्ट करत माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले, "या हल्ल्यामुळे राजधानी कीवमधील १,००० हून अधिक निवासी इमारतींचा हीटिंग पुरवठा खंडित झाला असून येथील तापमान उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. नागरिक थंडीने गारठले आहेत. रशियाने कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत जाणूनबुजून ऊर्जा केंद्रांवर हल्ला चढवला. सध्या बाधित भागांत दुरुस्तीचे काम सुरू आहे. याशिवाय, दुसऱ्या महायुद्धातीलऐतिहासिक 'मदरलँड' स्मारकाचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे." झेलेन्स्की पुढे म्हणाले, रशियाने सुमी, खार्किव, कीव, निप्रो, ओडेसा आणि विनित्सिया या भागांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये ९ जण जखमी झाले असून निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. Recovery efforts following the Russian strike across our regions are ongoing. Once again, there was a targeted attack specifically on energy facilities – the Russians used a significant number of ballistic missiles in combination with other missiles, more than 70 missiles in…pic.twitter.com/EymOingPiY यासंदर्भात बोलताना युक्रेनच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी म्हटले आहे की, "रशियाने दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या 'मदरलँड' स्मारकावर केलेला हल्ला निंदनीय आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान | Achira News