Achira News Logo
Achira News

रस्ते रुंदीकरण प्रकल्पात अडथळा आणण्याबाबत एम. टी. ए. चा महानगरपालिकांना इशारा

Maharashtra Times
रस्ते रुंदीकरण प्रकल्पात अडथळा आणण्याबाबत एम. टी. ए. चा महानगरपालिकांना इशारा
Full News
Share:

म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:रस्ता रुंदीकरणात बाधीत होणारी बांधकामे पाडण्याच्या कारवाईच्या आड येणाऱ्या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. महापालिका अधिनियमाचे कलम १/१० (अ) (ड) नुसार संबंधित नगरसेवकाला नोटीस द्या, त्यानंतर कारवाई कारवाई करा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या कलमानुसार रस्ता रुंदीकरणास विरोध करणाऱ्या किंवा अतिक्रमण हटाव कारवाईस विरोध करणाऱ्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होते.निवडणूक पार पडल्यानंतर आणिमहापौर - उपमहापौर पदाचीनिवडणूक दहा फेब्रुवारी रोजी असताना महापालिकेचे प्रशासन एकदम अलर्ट मोडमध्ये आले आहे. विकास योजनेतील आठ रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय सोमवारी (दोन फेब्रुवारी) पोलिस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शहरात पुन्हा लवकरच पाडापाडी सुरु होईल असे मानले जात आहे.Crime news: निराला बाजारात फिल्मी स्टाईल राडा! सिगारेट आणि 5 हजारांसाठी पान टपरीचालकावर पिस्तुल रोखली ; गल्ल्यातील रोकडही लंपासमहापालिकेने जून - जुलै महिन्यात शहरातरस्ता रुंदीकरणाची मोहीमराबवली, आठ रस्त्यांवर पाडापाडीची कारवाई करुन सुमारे साडेपाच हजार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर रुंदीकरणाच्या कारवाईला ब्रेक लागला. आता पुन्हा ही कारवाई सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाआहे. या संदर्भात सोमवारी पालिका मुख्यालयात पोलिस प्रशासनासोबत बैठक पार पडली. पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले , महापालिकेचे अतिक्रमण बचाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.रस्ता रुंदीकरणाची कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार रुंदीकरण करताना सुरुवातीला त्या रस्त्याचा टोटल स्टेशन सर्व्हे करा, रस्त्यात बाधीत होणाऱ्या मालमत्तांचे संपादन करण्यापूर्वी संबंधित मालमत्ताधारकाला नोटीस बजवा, नोटीस बजावल्यानंतर त्या मालमत्ताधारकाचे म्हणणे ऐकून घ्या, त्यानंतर भूसंपादनाची कारवाई करुन रस्ता रुंदीकरण करा, असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.Sanjay Shirsat : मर्सिडीज खड्यात आदळली, टायर फुटले; संजय शिरसाटांनी अपघाताचा थरार सांगितलारस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवतानामहापालिका व पोलिस प्रशासनयांच्या सोयीने तारीख, दिवस निश्चित करा, मोहीम सुरू करण्याच्या आठ दिवस अगोदर पोलिस प्रशासनाला कळवा असे निर्देशदेखील बैठकीच्या दरम्यान देण्यात आले. रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना त्याचे पूर्णपणे व्हिडिओ चित्रीकरणाचे स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रस्ते रुंदीकरण प्रकल्पात अडथळा आणण्याबाबत एम. टी. ए. चा महानगरपालिकांना इशारा | Achira News