Achira News Logo
Achira News

रोहित शेट्टीः बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमागील अॅक्शन-पॅक दिग्दर्शक

Loksatta
रोहित शेट्टीः बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमागील अॅक्शन-पॅक दिग्दर्शक
Full News
Share:

Rohit Shetty Networth : रोहित शेट्टी बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. रोहित शेट्टी नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. ॲक्शनपट बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याच्या बऱ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तो चित्रपटांची निर्मितीही करतो, पण तुम्हाला माहीत आहे का त्याची नेटवर्थ किती आहे. रोहित शेट्टी ॲक्शनपटांसाठी ओळखला जातो. प्रेक्षक त्याचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दीही करतात. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. रोहितने २००३ मध्ये ‘जमीन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं. या चित्रपटातअजय देवगण,अभिषेक बच्चन आणिबिपाशा बासूहे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. अजय देवगणबरोबर त्याने यानंतर अनेक चित्रपट केले आणि त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. ‘जमीन’ चित्रपटानंतर रोहितने ‘सिंघम’, ‘गोलमाल’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले. यामध्येसुद्धा अजय देवगण मुख्य भूमिकांमध्ये होता. या चित्रपटांचे सिक्वलही हिट ठरले. रोहितने बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. रोहित शेट्टीच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर एबीपीच्या वृत्तानुसार त्याची एकूण नेटवर्थ २८० कोटी इतकी आहे; तर रोहित शेट्टीची महिन्याची कमाई ही तब्बल ३.५८ कोटी इतकी आहे आणि तो वर्षाला ३८.६७ कोटींची कमाई करतो. चित्रपटांसाठी तो जवळपास १७.६९ कोटींचं मानधन घेतो. यासह तो जाहिरातीत काम करण्यासाठी ५.१२ कोटी रुपये घेतो. कर्लस टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’चं सूत्रसंचालन करण्यासाठीसुद्धा तो कोट्यवधी घेतो. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ‘खतरों के खिलाडी’ सीझन १४चं होस्टिंग करण्यासाठी त्याला ७०-८० कोटी इतकं मानधन मिळालेलं; तर मुंबईत दिग्दर्शक १० मजली इमारतीत राहतो. यासह त्याच्याकडे आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे. रोहितच्या गाड्यांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ जी६३, एएमजी कार अशा महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे, ज्यांची किंमत जवळपास ४.५ कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान, रोहित शेट्टी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. १ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबार झाला होता, पण सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रोहित शेट्टीः बॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमागील अॅक्शन-पॅक दिग्दर्शक | Achira News