मुंबई :आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्याच्या वेळी रोहित शर्मा जायबंदी झाला, तेव्हापासून तो प्रत्येक सामन्यापूर्वी सराव करीत होता. मात्र, त्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणूनही निवडले जात नव्हते. मात्र, आता सोमवारी झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्याच्या वेळी सूर्यकुमार यादवने आपला रोहित परतलाय असे सांगताच वानखेडे स्टेडियमवर टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र या सामन्यामध्ये नियमित कर्णधार हार्दिक पांडयासुद्धा प्रकृती ठीक नसल्यामुळे तो खेळू शकला नाही, असे सूर्याने नाणेफेकीच्या वेळी सांगितले. या लढतीचे नेतृत्व सूर्याने केले. या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून रायन रिकल्टन याला गौरवण्यात आले. सामना संपल्यावर रायन रिकल्टन याने हार्दिकच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.रायन रिकल्टन काय म्हणाला?मला माहित नाही की पुनम का परत कधी येईल. मला दुपारी समजले की त्याच्या पाठीचे स्नायू दुखावले गेले आहेत, त्यामुळे मला दुखापत नेमकी किती गंभीर आहे माहिती नाही. एक तर मी पूर्णपणे दुखापत म्हणू शकत नाही कारण ती किती गंभीर आहे त्याला काय होत आहे याबद्दल मला काहीच कल्पना नाही. पण मला एक खात्री आहे की आम्ही या आठवड्यात रायपूरला जात आहोत त्यावेळी तो संघासोबत असेल, असंरायन रिकल्टनयाने सांगितलं.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखवानखेडे स्टेडियमवरील या सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी 'मुंबई'चा बदली कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला रोहित शर्मा खेळणार आहे, असे जाहीर केल्यावर चाहत्यांना टाळ्यांचा कडकडाट केला होता. रोहितने जणू आकर्षक खेळी करून आपल्याला साथ देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. स्फोटक सुरुवातीनंतर 'लखनऊ'ला २२८ धावांत रोखण्यात 'मुंबई'ला यश आले होते. रोहित आणि रायन रिकल्टन या 'मुंबई'च्या सलामीवीरांनी चौकार षटकारांचा धडाका लावला. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ७० धावांचा चोप दिला, त्यांनी ६५ चेंडूंत १४३ धावांची भागीदारी करून 'मुंबई' च्या विजयाचा पाया रचला. रोहित शतकापासून दूर राहिला, पण तो परतला, त्यावेळी 'मुंबई'चा विजय स्पष्ट झाला होता.MI vs LSG : लखनौला लोळवल्यावर मुंबई इंडियन्ससाठी प्ले ऑफचं कसं असणार समीकरण? जाणून घ्यात्याआधी निकोलस पूरन आणि मिचेल मार्श मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची पिसे काढत होते. लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या ८ षटकांत १२३ धावांचा चोप दिला होता. मात्र त्यानंतर 'मुंबई'ने लागोपाठ विकेट घेताना धावगतीसही खीळ घातली. मात्र दोन धावांवर 'जीवदान' लाभलेल्या हिंमत सिंगने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करीत 'लखनऊ'ला दोनशेच्या पार नेले. 'लखनऊ'ने या मोसमातील पहिले द्विशतक अखेर त्यांच्या नवव्या सामन्यात गाठले.
रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मुंबईचा लखनौवर दणदणीत विजय
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.