Achira News Logo
Achira News

लोकसभा अध्यक्षांनी मला बोलण्यास रोखले, राहुल गांधींचा आरोप

Lokmat
लोकसभा अध्यक्षांनी मला बोलण्यास रोखले, राहुल गांधींचा आरोप
Full News
Share:

विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांनी मंगळवारीलोकसभाअध्यक्षओम बिर्लायांना पत्र लिहून सरकारच्या इशाऱ्यावर आपल्याला सभागृहात बोलण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांच्यावर केला. लोकशाहीवरील हा काळा डाग असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले. विरोधी पक्षनेता व प्रत्येक सदस्याला सभागृहात बोलण्याचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेचे अभिन्न अंग आहे. मात्र, त्या मतस्वातंत्र्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असल्याचेराहुल गांधीयांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होता आणि विरोधी पक्षनेता म्हणून मला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर बोलण्यापासून जाणूनबुजून रोखले जात आहे, हे गंभीर आहे. विरोधी पक्षाच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करणे ही लोकसभेच्या अध्यक्षांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

लोकसभा अध्यक्षांनी मला बोलण्यास रोखले, राहुल गांधींचा आरोप | Achira News