Achira News Logo
Achira News

लखनौमधील विनायक टॉवरच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Times
लखनौमधील विनायक टॉवरच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीचा मृत्यू
Full News
Share:

लखनऊ: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन व्यक्तींच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ च्या जवळ असलेल्या महागुनपुरम सोसायटीत घडली. विनायक टॉवरच्या १३ व्या मजल्यावरुन एका ४० वर्षीय व्यक्तीनं उडी मारली. राजवीर असं त्याचं नाव आहे. राजवीरनं १३ व्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं.एका व्यक्तीनं जीवन संपवल्याची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. विनायक टॉवरच्या तळमजल्यावर राजवीरच्या आईचा फ्लॅट आहे. पोलीस या फ्लॅटमध्ये गेले. तिथे एका महिलेचं शव होतं. हे शव राजवीरच्या आईचं असल्याचं सांगण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.Crime News: वेळ अन् ठिकाण ठरवा! 15 पोलिसांचे मुडदे पडतील! धमकी देणारा कुख्यात गुन्हेगार एन्काऊंटरमध्ये ठारमहागुनपुरम एओएचे महासचिव डॉक्टर सुरजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. विनायक टॉवरच्या तळमजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक ०२८ मध्ये राजवीर नावाच्या व्यक्तीची आई राहते. गुरुवारी राजवीरनं इमारतीच्या तेराव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. राजवीर इतरांचं भविष्य सांगायचा. राजवीर टोकाचं पाऊल उचलेल असा विचारही कोणी केला नव्हता.स्थानिक रहिवासी सचिन त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर पॉडकास्टचं काम करायचा. काही दिवसांपासून त्याला बरंच आर्थिक नुकसान सहन करावं लागत होतं. राजवीरची पत्नी किरण बाला स्वत:च्या मुलांसह गौड सिटीमध्ये स्वतंत्र राहते. राजवीरचं शव ताब्यात घेतल्यावर पोलीस फ्लॅट क्रमांक ०२८ मध्ये पोहोचले. तेव्हा आतून तीव्र दुर्गंधी येत होती. पोलिसांनी दार उघडलं, तेव्हा त्यांना आतमध्ये बेडवर राजवीरच्या आईचं शव दिसलं.Youth Dies In Wedding: लग्नात जेवणावर ताव, रसगुल्ला खाताना तरुणाचा मृत्यू; लग्न मंडपात गोंधळ, कुटुंब धक्क्यातयानंतर कवीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहोचले. राजवीरच्या आईचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले असावेत, असा अंदाज एसीपी सूर्यबली मौर्या यांनी व्यक्त केला. मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही. घटनास्थळी फॉरेन्सिकचं पथक पोहोचलं आहे. सगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत. आई आणि मुलाच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

लखनौमधील विनायक टॉवरच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीचा मृत्यू | Achira News