Ashok Kharat Case :नाशिकमधीलअशोक खरात याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्याला काल पोलिसांनी अटक केली, या प्रकरणी आता पोलिसांनी आणखी तपास सुरू केला असून काल त्याच्या फॉर्म हाऊस आणि निवासस्थानाची झाडाझडती घेतली. पोलिसांना त्याच्या फॉर्महाऊससमध्ये एक पिस्तूलही सापडले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन आठवड्या पूर्वीच आल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. होर्मुझनंतर आता इराणने 'यानबू'ला केले लक्ष्य; सौदीच्या सॅमरेफ रिफायनरीवर केला हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस महासंचालकांशी चर्चा केली होती. दोन आठवड्यापासून पोलिसांनी ही कारवाई गुप्त ठेवली होती. पोलिसांनी आधी पुरावे गोळा केले. यानंतरच पोलिसांनी धडक कारवाई केली. चोर शिरल्याचे कारण देत केला प्रवेश पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या निवासस्थान परिसरात चोर शिरल्याचे कारण दिले. पोलिसांनी परिसरात तपास केल्याचे दाखवले. यानंतर पोलिसांनी अशोक खरात याच्या निवासस्थानी प्रवेश केला. बाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला, यानंतर पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेतले. राज्य सरकारने SIT नेमली शोक खरात प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेले अन्य काही काळे कारनामे आणि त्याचे लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अशोक खरात याला अटक; इराणने सौदीच्या यानबूला लक्ष्य केले
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.