नाशिक - महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात भोंदूबाबा कॅप्टनअशोक खरातराज्यात चर्चेत आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून तपास करण्याचे आदेश दिलेत. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे एसआयटीचे प्रमुखपद दिले आहे. खरात प्रकरणातील तपासात बरेच आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो हाती लागले आहेत. सेलेब्रिटीपासून अनेक राजकीय मंडळी खरातचे भक्त होते. अशोक खरातयाने राजकीय नेते, प्रशासनातील बडे अधिकारी त्याशिवाय सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमवली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. नाशिक शहर, सिन्नर येथे आलिशान बंगले, मीरगाव येथे फार्म हाऊस सोबतच अनेक जमिनी स्वत: तसेच कुटुंबियांच्या नावे आहेत. सोने, चांदी, मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशी एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तपासात आता पुढे काय? 'एसआयटी'कडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडीओंमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली, याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे. नोकराकडूनच धमकी ? नीरज जाधव हा खरातकडे ऑफिसबॉय होता. शिर्डीच्या तक्रारदार तरुणीच्या माहितीनुसार नाशिकला खरातच्या कार्यालयात नीरजशी ओळख झाली. जाधव बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
लैंगिक शोषणाचा आरोपी गुंडः राज्य सरकारने चौकशीसाठी एस. आय. टी. ची स्थापना केली
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.