म. टा. प्रतिनिधी, लोणावळा:लोणावळा परिसरात सोलो ट्रेक करण्यासाठी आलेल्या विधी शाखेच्या विद्यार्थिनीचा रविवारी (एक फेब्रुवारी) लोणावळ्याजवळीलटायगर पॉइंटयेथील खोल दरीत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, हा प्रकार आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. श्रेया नरेंद्र पती (वय २०, रा. सीबीडी बेलापूर, मुंबई) असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे.श्रेयाचे वडील सनदी लेखापाल (सीए) असून, आई गृहिणी आहे. तिच्या भावाचे परदेशातून शिक्षण पूर्ण झाले आहे. श्रेयाला फिरण्याची आवड होती. शनिवारी लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळांना तिने भेट दिली. टायगर पॉइंट येथे एका टपरीजवळ काही जणांना श्रेयाची पिशवी (सॅक) मिळून आली. पिशवीमध्ये ओळखपत्र, मोबाइल, लॅपटॉप मिळून आला. त्यावरून पोलिसांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच श्रेयाच्या नातेवाइकांनीलोणावळा ग्रामीण पोलिसांकडेधाव घेतली आणि ती बेपत्ता झाल्याची नोंद केली.Ajit Pawar Phone Call: अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल समोर; अपघाताच्या 6 मिनिटांपूर्वी कार्यकर्त्याशी बोलले, म्हणाले, आम्ही पण सर्व...श्रेयाचा शोध घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. अखेर पोलिसांनी श्वानपथक व ड्रोनच्या साहाय्याने शोध सुरू केला. दुर्गा नावाच्या श्वानाला श्रेयाच्या बॅगमधील रुमालाचा वास देताच दुर्गाने माग काढून खोल दरीत ज्या ठिकाणी मृतदेह होता त्या ठिकाणी गेली; तसेच ड्रोनच्या कॅमेरातही येथीलदरीत मृतदेहदिसून आला.Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडामोबाइल, लॅपटॉपमधून माहिती मिळू शकतेश्रेयाला फिरण्याची आवड होती. मात्र, तिच्या सततच्या फिरण्याला घरच्यांचा विरोध होता. त्याचा श्रेयाला राग होता. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी का, किंवा इतर काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला किंवा काही घातपात आहे का; ती लोणावळ्यात फिरण्यासाठी एकटीच आली होती की आणखी कोणी तिच्यासोबत होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. श्रेयाच्या पिशवीतसुसाइड नोटमिळून आलेली नाही. तिच्या मोबाइल आणि लॅपटॉपला पासवर्ड असून, मोबाइल, लॅपटॉपमधूनही काही माहिती मिळू शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
लोणावळ्यात एकट्याने प्रवास करताना कायद्याच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.