थोडक्यात:केसांची चमक आणि घनता कमी होत असेल, तर आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.बायोटिन (व्हिटॅमिन B7) हे केसांच्या मुळांना बळकट करतं आणि गळती रोखतं.बायोटिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास केस अधिक दाट, मजबूत आणि निरोगी होऊ शकतात.Biotin Rich Foods For Long And Shiny Hair:तुमचे केस आधीसारखे दाट आणि चमकदार राहिले नाहीत का? जर होय, तर तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे! केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ महागडे शॅम्पू किंवा ट्रीटमेंट पुरेसे नाहीत, तर योग्य पोषणही तितकेच आवश्यक आहे. चला, जाणून घेऊया ५ बायोटिनयुक्त पदार्थ (Biotin Rich Foods) जे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक आणि मजबुती देऊ शकतात.तुमचे केस कोरडे, निस्तेज झाले असतील किंवा कमकुवत झाले असतील; केस गळती वाढली असेल किंवा केसांची वाढ थांबली असेल, तर यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बायोटिनची कमतरता असू शकते.बायोटिन, ज्याला व्हिटॅमिन B7 देखील म्हणतात, हे केस, त्वचा आणि नखांसाठी अतिशय आवश्यक आहे. हे केसांच्या मुळांना मजबूत करते, गळती थांबवते आणि केसांना नैसर्गिक चमक देते. चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या आहारात काही बायोटिन-युक्त पदार्थ समाविष्ट करून केसांची घनता आणि आरोग्य सुधारू शकता.बदाम आणि अक्रोड केवळ मेंदूसाठी नाही, तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत! यामध्ये भरपूर प्रमाणात बायोटिन, व्हिटॅमिन E आणिओमेगा-३ फॅटी ॲसिड्सअसतात, जे केस तुटण्यापासून वाचवतात आणि त्यांना मजबूत करतात.दररोज ५-६ भिजवलेले बदाम आणि २-३ अक्रोड खाल्ले तर योग्य परिणाम दिसून येतात.मजबूत आणि दाट केस हवे असतील, तर आहारात अंडी समाविष्ट करा! अंड्याच्या पिवळ्या भागात (Egg Yolk) भरपूर बायोटिन असते, जे केसांच्या वाढीस मदत करते. तसेच, अंड्यात प्रथिने आणि ॲमिनो ॲसिड असतात, जे खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत करतात.रोज १-२ उकडलेलीअंडीखा किंवा अंड्याचे ऑमलेटही खाल्ले तरी चालते.ॲव्होकाडो हे एक सुपरफूड आहे जे केसांना मुलायम चमकदार बनवते. यामध्ये बायोटिन, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन E असतात, जे टाळूचे आरोग्य सुधारतात आणि केस गळती थांबवतात.ॲव्होकाडोचे स्मूदी, सलाड किंवा सॅन्डविचमध्ये घालून सेवन करू शकता.केसांचे आरोग्य सुधारायचे असेल, तर आहारात सूर्यफुलाच्या बिया जरूर समाविष्ट करा. यामध्ये बायोटिन, झिंक आणि व्हिटॅमिन B6 असते, जे केसांच्या मुळांना बळकट करतात आणि नवीन केस वाढण्यास मदत करतात.१-२ चमचे सूर्यफुलाच्या बिया स्नॅक्स म्हणून खा किंवा सॅलडमध्ये टाका.रताळ्यामध्ये बायोटिन, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केस गळणे थांबवतात आणि केसांची लांबी वाढवण्यास मदत करतात.उकडलेले किंवा भाजलेले रताळे खा किंवा चवदार चाट तयार करून खा.केसांची चमक आणि लांबी टिकवण्यासाठी फक्त बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही, तर योग्य आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही बायोटिनयुक्त पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले, तर तुमच्या केसांचे आरोग्य लवकरच सुधारू शकेल.
लांब, चमकदार केसांसाठी बायोटिनयुक्त अन्नपदार्थः निरोगी कुलूपांसाठी मार्गदर्शक
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.