Achira News Logo
Achira News

लासलगावमध्ये उष्णतेची लाटः भावांच्या अभिनव उपायामुळे गायी तापण्यापासून वाचल्या

Lokmat
लासलगावमध्ये उष्णतेची लाटः भावांच्या अभिनव उपायामुळे गायी तापण्यापासून वाचल्या
Full News
Share:

लासलगाव :जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. थंडीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा सूर्याचा प्रखर कोप पाहायला मिळत असून,तापमानाचापारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या वाढत्या उकाड्याचा फटका केवळ मानवांनाच नाही, तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत, लासलगाव येथील प्रमोद पाटील आणि महेंद्र पाटील याशेतकरीबंधूंनी आपल्या गोठ्यातील गायींना उन्हापासून वाचवण्यासाठी फॉगर यंत्रणेचा यशस्वी आणि किफायतशीर प्रयोग राबवला आहे. गेल्या काही दिवसांपासूनतापमानसातत्याने ४० अंशांच्या वर असल्याने पाटील यांच्या गोठ्यातील गाई अस्वस्थ झाल्या होत्या. उष्णतेमुळे जनावरांच्या खाण्यावर परिणाम होऊन त्यांची तब्येत खालावली होती, ज्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर झाला होता. जनावरांचा हा त्रास ओळखून पाटील - बंधूंनी गोठ्यातील तापमान नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. गोठ्यात नैसर्गिक थंडावा निर्माण करण्यासाठी त्यांनी सुमारे ७ हजार रुपये खर्च करून १६ फॉगर (सूक्ष्म फवारणी यंत्रे) बसवले. या यंत्रणेद्वारे गोठ्यात पाण्याचे अतिसूक्ष्म तुषार उडवले जातात, ज्यामुळे वातावरणातील उष्णता शोषली जाऊन गोठ्यात गारवा निर्माण होतो. प्रयोगाचे सकारात्मक परिणामफॉगरमुळे गोठ्यातील तापमान बाहेरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.आरोग्यात सुधारणा :गाईंचा उन्हाचा ताण कमी झाला असून त्या आता अधिक उत्साही दिसत आहेत.दूध वाढले :जनावरांच्या आहारात सुधारणा झाल्यामुळे दूध उत्पादनात पुन्हा वाढ झाली आहे. इतर पशुपालकांसाठी दिशादर्शक प्रयोगबदलत्या हवामानातशेतीआणि दुग्धव्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. लासलगावच्या याशेतकरीबंधूंनी अत्यंत कमी खर्चात केलेला हा प्रयोग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, इतर पशुपालकही या फॉगर पॅटर्नची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. कडक उन्हामुळे गाई चारा खात नव्हत्या आणि दूधही कमी झाले होते. पण, फॉगर बसवल्यापासून गोठ्यात गारवा राहतो, गाई शांत राहतात आणि उत्पादनातही वाढ झाली आहे.- प्रमोद पाटील, प्रयोगशील शेतकरी, लासलगाव Dairy Farming : दुधात घट झाली, उन्हाळ्यात संकरीत गाईंची 'अशी' घ्या काळजी; हा खास प्लॅन वापरा!

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

लासलगावमध्ये उष्णतेची लाटः भावांच्या अभिनव उपायामुळे गायी तापण्यापासून वाचल्या | Achira News